सांगलीत बेकायदेशीर सावकारीप्रकरणी तिघांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:28 IST2021-04-02T04:28:15+5:302021-04-02T04:28:15+5:30
सांगली : १० टक्के व्याजदराने ७० हजार रुपये घेत ८० हजार रुपये परत करूनही अजून साठ हजारांसाठी मारहाण करणाऱ्या ...

सांगलीत बेकायदेशीर सावकारीप्रकरणी तिघांवर गुन्हा
सांगली : १० टक्के व्याजदराने ७० हजार रुपये घेत ८० हजार रुपये परत करूनही अजून साठ हजारांसाठी मारहाण करणाऱ्या तिघांवर सांगली ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी प्रसाद हरी खाडीलकर (रा. गजानन कॉलनी, हरिपूर) यांनी विशाल विलास नलवडे, वैशाली सूर्यवंशी (दोघेही रा. रामनगर, सांगली) व विजय कोळी या तिघांविरोधात फिर्याद दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, एलआयसी एजंट म्हणून काम करणाऱ्या प्रसाद खाडीलकर यांनी विशाल नलवडे याच्याकडून १० टक्के व्याजदराने ७० हजार रुपये घेतले होते. या रकमेच्या बदल्यात खाडीलकर यांनी वेळोवेळी ८० हजार रुपये परत केले असतानाही त्यांच्याकडून अजून ६० हजारांची मागणी करण्यात येत होती. ही रक्कम ते देऊ न शकल्याने त्यांना मारहाण करून जिवे मारण्याची धमकीही देण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.