सांगलीत ट्रक अडवून पैशांची मागणी करणाऱ्यांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:24 IST2021-04-19T04:24:00+5:302021-04-19T04:24:00+5:30
सांगली : शहरातील धामणी रोडवर पत्ता विचारण्यासाठी थांबलेला ट्रक अडवून हमालीसाठी पैसे मागणी करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

सांगलीत ट्रक अडवून पैशांची मागणी करणाऱ्यांवर गुन्हा
सांगली : शहरातील धामणी रोडवर पत्ता विचारण्यासाठी थांबलेला ट्रक अडवून हमालीसाठी पैसे मागणी करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी बसवेश्वर सुरेश कांबळे (रा. जेवली, जि. उस्मानाबाद) याने शिवाजी बापू खांडेकर (रा. संजयनगर) व पांडुरंग श्रीरंग शेजाळ (रा. सिध्दनाथ कॉलनी, पुपवाड) या दोघांविरोधात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शनिवारी दुपारी दोनच्या सुमारास बसवेश्वर व क्लीनर महादेव बनसोडे हे धामणी रोडवरील जुन्या जकात नाक्याजवळ ट्रक घेऊन आले होते. त्यांना सांगली शहरातील माहिती नसल्याने त्यांनी कुपवाड एमआयडीसी कुठे आहे, हे विचारण्यासाठी संशयितांना बोलावले. त्यांनी हा पत्ता वाचल्यानंतर या मालाची वारणी (हमाली) म्हणून आम्हाला ४९० रूपये दे, अन्यथा तुझा ट्रक जाऊ देणार नाही, असे म्हणत पैशांची मागणी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.