महिलेच्या छळप्रकरणी सातजणांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:40 IST2021-02-26T04:40:07+5:302021-02-26T04:40:07+5:30

शिराळा : येथील मोरणा धरण रस्त्याजवळ राहणाऱ्या विवाहित महिलेचा माहेरून दहा लाख रुपये आणण्यासाठी मानसिक व शारीरिक छळ केल्याप्रकरणी ...

Crime against seven persons for molesting a woman | महिलेच्या छळप्रकरणी सातजणांवर गुन्हा

महिलेच्या छळप्रकरणी सातजणांवर गुन्हा

शिराळा : येथील मोरणा धरण रस्त्याजवळ राहणाऱ्या विवाहित महिलेचा माहेरून दहा लाख रुपये आणण्यासाठी मानसिक व शारीरिक छळ केल्याप्रकरणी शिराळा पोलीस ठाण्यात पती, सासू, सासरे आदींसह सातजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव जिल्ह्यातील नम्रता आशिष बसुगडे ही विवाहित महिला सध्या शिराळा येथे राहत आहे. या महिलेस पती आशिष बाबासाहेब बसुगडे , वासंती बाबासाहेब बसुगडे, बाबासाहेब भगवान बसुगडे, अभिजित बाबासाहेब बसुगडे, अनिकेत बाबासाहेब बसुगडे (सर्व रा. पिंपळगाव, जि. जळगाव), शशिकला दिलीप पाटील, रामचंद्र शंकर पाटील (दोघे रा. बिसूर, ता. मिरज) यांनी ऑक्टोबर २०१७ ते मे २०१९ या दरम्यान वारंवार शारीरिक व मानसिक छळ केला असल्याची फिर्यादीत म्हटले आहे. तपास हवालदार दीपक खोमणे करीत आहेत.

Web Title: Crime against seven persons for molesting a woman