मिरजेत उद्योजकास दमदाटी करणाऱ्या खासगी सावकाराविरुद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:27 IST2021-09-19T04:27:59+5:302021-09-19T04:27:59+5:30

समीर देसाई यांना व्यवसायात अर्थिक अडचण आल्याने त्यांनी मे २०१७ मध्ये शिरीष शिंदे यांच्याकडून एक लाख ८० हजार रुपये ...

Crime against a private lender who is harassing an entrepreneur in Miraj | मिरजेत उद्योजकास दमदाटी करणाऱ्या खासगी सावकाराविरुद्ध गुन्हा

मिरजेत उद्योजकास दमदाटी करणाऱ्या खासगी सावकाराविरुद्ध गुन्हा

समीर देसाई यांना व्यवसायात अर्थिक अडचण आल्याने त्यांनी मे २०१७ मध्ये शिरीष शिंदे यांच्याकडून एक लाख ८० हजार रुपये दर महिना पाच टक्के व्याज दराने घेतले होते. या रकमेचे व्याज व मुद्दल असे एकूण तीन लाख १६ हजार रुपये सावकार शिंदे यास दिले. शिंदे याने देसाई यांचा मोबाइलही घेतला. कर्जाची रक्कम वसुल करूनही शिंदे याने समीर देसाई यांना आणखी अडीच लाख रुपये व्याजाची मागणी केली. देसाई यांच्याकडून घेतलेले धनादेश बँकेत जमा करून अडीच लाख देण्यासाठी सावकार शिंदे याने देसाई यांना धक्काबुक्की शिवीगाळ व दमदाटी केल्याची तक्रार आहे. याबाबत देसाई यांच्या फिर्यादीनुसार पोलीसांनी सावकार शिरीष शिंदे याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Crime against a private lender who is harassing an entrepreneur in Miraj