बामणोलीत राष्ट्रध्वजाच्या अवमानप्रकरणी एकावर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:31 IST2021-08-20T04:31:24+5:302021-08-20T04:31:24+5:30

कुपवाड : बामणोली (ता. मिरज) येथील दत्तनगर एमआयडीसीतील मेब इंडस्ट्रीज या कारखान्यात स्वातंत्र्य दिनानिमित्त तिरंगा झेंड्याचे ध्वजारोहण केले होते. ...

Crime against one for insulting national flag in Bamnoli | बामणोलीत राष्ट्रध्वजाच्या अवमानप्रकरणी एकावर गुन्हा

बामणोलीत राष्ट्रध्वजाच्या अवमानप्रकरणी एकावर गुन्हा

कुपवाड : बामणोली (ता. मिरज) येथील दत्तनगर एमआयडीसीतील मेब इंडस्ट्रीज या कारखान्यात स्वातंत्र्य दिनानिमित्त तिरंगा झेंड्याचे ध्वजारोहण केले होते. तो झेंडा सायंकाळपर्यंत उतरणे गरजेचे असतानाही रात्रीपर्यंत ठेवून राष्ट्रीय ध्वजाचा अवमान केल्याप्रकरणी जेसाहेब मेहबूब शेख (वय ६०, रा. केसरी गल्ली, सांगली) यांच्या विरोधात कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दत्तनगर एमआयडीसीतील मेब इंडस्ट्रीज या कारखान्यात स्वातंत्र्य दिनानिमित्त सकाळी तिरंगा झेंड्याचे ध्वजारोहण केले होते. तो झेंडा सायंकाळपर्यंत उतरणे गरजेचे असताना त्यांनी तो ध्वज रात्री पावणे अकरा वाजेपर्यंत तसाच ठेवला. त्यामुळे कुपवाड पोलिसांनी राष्ट्रीय ध्वजाचा अवमान केला म्हणून जेसाहेब शेख यांच्याविरोधात पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. हवालदार सतीश माने तपास करीत आहेत.

Web Title: Crime against one for insulting national flag in Bamnoli