कोरोना नियमावलीच्या उल्लंघनप्रकरणी नितीन चौगुलेंवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:42 IST2021-02-23T04:42:34+5:302021-02-23T04:42:34+5:30
सांगली : कोरोनाविषयक सुरक्षा नियमांचे पालन न करता मेळावा घेत गर्दी केल्याबद्दल नितीन चौगुले यांच्यासह सहाजणांवर संजयनगर पोलिसात ...

कोरोना नियमावलीच्या उल्लंघनप्रकरणी नितीन चौगुलेंवर गुन्हा
सांगली : कोरोनाविषयक सुरक्षा नियमांचे पालन न करता मेळावा घेत गर्दी केल्याबद्दल नितीन चौगुले यांच्यासह सहाजणांवर संजयनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नितीन बाळासाहेब चौगुले (रा. माधवनगर), चंद्रकांत मैगुरे (रा. मिरज), सतीश वसंत खांबे (रा. दुधगाव), नीलेश राजू चौगुले, प्रशांत शिवाजीराव गायकवाड, सुरेंद्र रंगराव इरळे (सर्व रा. सांगली) आदींचा यात समावेश आहे.
रविवारी चौगुले यांनी माधवनगर रोडवरील डेक्कन मॅन्युफॅक्चरिंग हाॅलमध्ये मेळावा घेत शिवप्रतिष्ठानशी काडीमोड घेत नवीन संघटनेची स्थापना केली होती. या मेळाव्यास संपूर्ण राज्यभरातून मोठी गर्दी झाली होती.
कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता, सार्वजनिक ठिकाणी गर्दी करण्यास निर्बंध असतानाही या मेळाव्यास गर्दी झाल्याने संजयनगर पोलिसांनी चौगुले यांच्यासह इतरांवर कोरोनाविषयक नियमावलीचे उल्लंघन केल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे.