मिरजेत वकील महिलेसह पतीवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:19 IST2021-06-17T04:19:05+5:302021-06-17T04:19:05+5:30

मिरजेत गांधी चौक पोलिसात दोन महिन्यापूर्वी एका व्यक्तीवर बाललैगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी ॲड. ...

Crime against husband with Miraj lawyer woman | मिरजेत वकील महिलेसह पतीवर गुन्हा

मिरजेत वकील महिलेसह पतीवर गुन्हा

मिरजेत गांधी चौक पोलिसात दोन महिन्यापूर्वी एका व्यक्तीवर बाललैगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी ॲड. आरती व्हसपुरे यांनी खोटा गुन्हा दाखल करण्यास मदत करून पोलिसांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केल्याचा आराेप आहे. जुन्या गुन्ह्यातील आरोपींना मदतीसाठी फिर्यादी व साक्षीदारावर दबाव आणण्यासाठी खोटा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे चाैकशीत निष्पन्न झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. याप्रकरणी गांधी चौक पोलिसांनी व्हसपुरे दाम्पत्यावर गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल केल्याने व्हसपुरे दाम्पत्याने जिल्हा व सत्रन्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. पोलिसांनी दोघांविरुद्ध पुरावे सादर केल्याने सत्रन्यायालयाने ॲड. आरती व्हसपुरे व रविचंद व्हसपुरे यांचा अटकपूर्व जामीन फेटाळल्याचे निरीक्षक चव्हाण यांनी सांगितले. खोटे गुन्हे दाखल करण्यासाठी पोलिसांवर दबाब आणण्याचे प्रकार खपवून घेण्यात येणार नसल्याचेही पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी सांगितले.

Web Title: Crime against husband with Miraj lawyer woman