मल्लेवाडीत रास्ता रोको करणाऱ्या आठ ग्रामस्थांविरुद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:32 IST2021-02-17T04:32:19+5:302021-02-17T04:32:19+5:30

रास्ता रोकोप्रकरणी भाजप पदाधिकारी रविकांत हरिशचंद्र साळुंखे यांच्यासह देवेंद्र राजाराम फल्ले, अमर ज्ञानेश्वर जाधव, केशव ज्ञानेश्वर साळुंखे, मदन शिंदे, ...

Crime against eight villagers who blocked the road in Mallewadi | मल्लेवाडीत रास्ता रोको करणाऱ्या आठ ग्रामस्थांविरुद्ध गुन्हा

मल्लेवाडीत रास्ता रोको करणाऱ्या आठ ग्रामस्थांविरुद्ध गुन्हा

रास्ता रोकोप्रकरणी भाजप पदाधिकारी रविकांत हरिशचंद्र साळुंखे यांच्यासह देवेंद्र राजाराम फल्ले, अमर ज्ञानेश्वर जाधव, केशव ज्ञानेश्वर साळुंखे, मदन शिंदे, तानाजी साळुंखे, अंकुश शिंदे, वैभव शिंदे (सर्व रा. गणेशनगर, मल्लेवाडी, ता. मिरज) यांच्याविरुद्ध जमावबंदी आदेशाचा भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिरज-सलगरे राज्यमार्गाच्या कामासाठी जुन्या रस्त्याची खुदाई करून नवीन रस्ता करण्यात येत आहे. त्यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात धूळ आहे. वृद्धांना व लहान मुलांना धुळीच‍ा त्रास होत असल्याने राज्यमार्गाचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे, या मागणीसाठी मल्लेवाडीत गणेशनगर येथे सोमवारी शेतकर्‍यांनी व ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन केले होते. जिल्ह्यात बंदीआदेश लागू असताना, रास्ता रोको आंदोलन केल्याबद्दल आठजणांविरुद्ध पोलीस हवालदार चंद्रकांत वाघ यांनी ग्रामीण पोलिसात फिर्याद दिली आहे.

Web Title: Crime against eight villagers who blocked the road in Mallewadi