मुंबईच्या पोलिसासह आठ जणांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:31 IST2021-09-17T04:31:38+5:302021-09-17T04:31:38+5:30
विटा : ठाणे येथे फ्लॅट घेण्यासाठी पत्नीला माहेरून पैसे आणण्याचा तगादा लावण्यासोबत तलाख देण्यासाठी छळ केल्याप्रकरणी पोलिसावर गुन्हा दाखल ...

मुंबईच्या पोलिसासह आठ जणांवर गुन्हा
विटा : ठाणे येथे फ्लॅट घेण्यासाठी पत्नीला माहेरून पैसे आणण्याचा तगादा लावण्यासोबत तलाख देण्यासाठी छळ केल्याप्रकरणी पोलिसावर गुन्हा दाखल झाला. याप्रकरणी सौ. शिरीन रफिक शिकलगार (वय २५, रा. ढवळेश्वर, सध्या रा. विटा, मुल्ला गल्ली, ता. खानापूर) यांनी पती रफीक हजरत शिकलगार, सासू मुमताज, सासरे हजरत गुलाब शिकलगार, दीर समीर, जाऊ सानिया समीर शिकलगार, नणंद आसमा मुनीर शिकलगार, चुलत दीर शकील महमंद शिकलगार, चुलत सासू मदिना महमंद शिकलगार या सासरच्या आठ जणांविरुद्ध विटा पोलिसांत गुन्हा दाखल केला.
ढवळेश्वर येथील रफिक शिकलगार मुंबई पोलीस दलात आहे. त्याचा विवाह विटा येथील शिरीन शिकलगार यांच्याशी दि. २७ ऑगस्ट २०१५ रोजी विटा येथे झाला होता. २०१६ पासून सौ. शिरीन यांचा सासरच्या मंडळींकडून स्वयंपाक करण्यावरून तसेच ठाणे येथे घर घेण्यासाठी माहेरून पैसे आणण्यासाठी वारंवार छळ सुरू झाला. याबाबत शिरीन यांनी छळाची माहिती पती रफीकला दिली. त्यावेळी रफीकने मुंबईतून ढवळेश्वर येथे येऊन शिरीन यांच्या वडिलांना व नातेवाईकांना बोलावून घेतले. वडिलांसमोर तलाख देण्याबाबत दम दिला. त्यावेळी शिरीन यांनी नकार दिला. शिरीन यांना तेथेच रस्त्यावर सोडून रफीक निघून गेला. त्यामुळे शिरीन यांनी सोमवारी विटा पोलिसांत आठ जणांविरूध्द गुन्हा दाखल केला.