जिल्हाप्रमुखांवरील गुन्हा सूडबुध्दीने

By Admin | Updated: April 1, 2016 01:24 IST2016-04-01T01:24:13+5:302016-04-01T01:24:13+5:30

शिवसेनेतर्फे निषेध : इस्लामपूर बंदचा इशारा

Crime against District President, Sudhuddin | जिल्हाप्रमुखांवरील गुन्हा सूडबुध्दीने

जिल्हाप्रमुखांवरील गुन्हा सूडबुध्दीने

इस्लामपूर : शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंदराव पवार यांच्यावर सूडबुध्दीने अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. त्याचे पडसाद शिवसेनेच्या गोटात उमटले. शहर शिवसेनेतर्फे या घटनेचा निषेध करण्यात आला. तसेच हा गुन्हा त्वरित मागे न घेतल्यास शनिवारी २ एप्रिल इस्लामपूर बंद ठेवण्याचा इशारा शहरप्रमुख शकील सय्यद यांनी दिला आहे.
त्यांनी दिलेल्या पत्रकात सदर मिळकतीशी कोणताही काडीमात्र संबंध नसल्याचा लेखी जबाब आनंदराव पवार यांनी पोलिसांना दिलेला आहे. मात्र त्यांची राजकारणातील लोकप्रियता बोचत असल्याने शंकर महापुरे या राष्ट्रवादीच्या दलित कार्यकर्त्याला फूस लावून तसेच पोलिसांना हाताशी धरून राजकीय द्वेषातून पवार यांच्याविरुध्द हे षड्यंत्र रचले आहे. या संपूर्ण घटनेची वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी योग्य ती चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करावे, अशी मागणी केली आहे. पत्रकावर उपजिल्हाप्रमुख नंदकुमार निलकंठ, तालुकाप्रमुख युवराज निकम यांच्या स्वाक्षरी आहेत. (वार्ताहर)

Web Title: Crime against District President, Sudhuddin