शिराळ्यात बनावट उत्पादनाबाबत गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:51 IST2021-03-04T04:51:45+5:302021-03-04T04:51:45+5:30
सांगली : भटवाडी (ता. शिराळा) येथील शिराळा एमआयडीसीमधील कांचन कार्पोरेशनमध्ये पोलिसांनी बुधवारी छापा टाकला. यावेळी बौद्धिक संपदा कायद्याच्या ...

शिराळ्यात बनावट उत्पादनाबाबत गुन्हा
सांगली
: भटवाडी (ता. शिराळा) येथील शिराळा एमआयडीसीमधील कांचन कार्पोरेशनमध्ये पोलिसांनी बुधवारी छापा टाकला. यावेळी बौद्धिक संपदा कायद्याच्या भंग करून बनविलेली बनावट जेएसडब्ल्यू पत्र्याची उत्पादने आढळून आली. याप्रकरणी पोलिसांनी बनावट कच्चा माल व मशिनरीसह एक लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी शहाजी गणपती पाटील (वय ४२, रा. चिकुर्डे ता. वाळवा) याच्याविरुद्ध कॉपीराइट ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत शैलेश जगन्नाथ जाधव (रा. मुंबई) यांनी वर्दी दिली असून ज्या कंपनीचे स्वामीत्वाचे अधिकार इआयपीआर कंपनी लिमिटेड या कंपनीला दिले गेले आहेत. त्या उत्पादनाचे एमआयडीसी येथे शहाजी पाटील हा बनावट पत्रा उत्पादन तयार करत हाेता. हे उत्पादन बाजारात विक्री करण्यासाठी चिकुर्डे येथील गाेदामात ठेवल्याचे आढळून आले. याप्रकरणी पंचनामा करुन एक लाख रुपयांचा माल जप्त केला आहे. तपास हवालदार जी. एस. झाजरे हे करत आहेत.