सुरूलला यात्रेत रथ ओढणाऱ्या २० जणांविरुद्ध गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:25 IST2021-03-14T04:25:05+5:302021-03-14T04:25:05+5:30
इस्लामपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर धार्मिक जत्रा, यात्रा, उरूस भरविण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केलेल्या प्रतिबंधाचा आदेश डावलून सुरूल (ता. वाळवा) येथे ...

सुरूलला यात्रेत रथ ओढणाऱ्या २० जणांविरुद्ध गुन्हा
इस्लामपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर धार्मिक जत्रा, यात्रा, उरूस भरविण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केलेल्या प्रतिबंधाचा आदेश डावलून सुरूल (ता. वाळवा) येथे यात्रा साजरा करणाऱ्या २० जणांविरुद्ध शनिवारी गुन्हा नोंद करण्यात आला.
सर्जेराव शंकर पाटील, महेश कैलास वायदंडे, निवृत्ती जगन्नाथ मदने, अशोक रंगराव पाटील, भगवान रघुनाथ पाटील, विक्रम सर्जेराव पाटील, दत्तात्रय मारुती पाटील, संग्राम विजय गायकवाड, माणिक परसू पाटील, शिवाजी परसू पाटील, पोपट रघुनाथ पाटील, शंकर कोळेकर, अभिजित सर्जेराव पाटील, महादेव तुकाराम बंडगर, किरण वसंत पाटील, संजय मारुती पाटील (चिंचेखालचा), नवनीत नानासाहेब पाटील, जयवंत मारुती पाटील, सुशील माणिक पाटील, बरमा बाळासाहेब पाटील (सर्व रा. सुरूल) यांच्यासह ४० ते ५० अनोळखींविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पेठ आणि सुरूल गावांच्या ग्रामदैवतांच्या यात्रा असल्याने सहायक पोलीस निरीक्षक अनिल जाधव, सहायक पोलीस फौजदार बाजीराव पाटील व पोलीस कर्मचारी परिसरात गस्त घालत होते. सुरूल गावात ६० ते ७० ग्रामस्थ रात्री सव्वादहाच्यासुमारास देवाचा रथ दोऱ्या लावून ओढत मंदिराच्या दिशेने येत होते. पोलिसांनी त्यांना थांबविण्याचा प्रयत्न करून यात्रेस आणि लोकांची गर्दी जमवून रथयात्रा काढता येणार नाही, कोरोना रोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे, गर्दी करू नका, असे सांगत असतानाही वरील ग्रामस्थांनी पोलिसांच्या म्हणणे न ऐकता बंदी आदेशाचा भंग केला. याबाबत पोलीस कर्मचारी सूर्यकांत निकम यांनी फिर्याद दिली आहे.