बेडग येथे राजे क्लबतर्फे क्रिकेट स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 05:06 IST2020-12-05T05:06:20+5:302020-12-05T05:06:20+5:30
बेडगमध्ये मदन पाटील यांच्या जयंतीनिमित्त आयोजित क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी जितेश कदम, मनोज शिंदे-म्हैसाळकर, संभाजी पाटील, दिलीप बुरसे, गजानन शिंदे ...

बेडग येथे राजे क्लबतर्फे क्रिकेट स्पर्धा
बेडगमध्ये मदन पाटील यांच्या जयंतीनिमित्त आयोजित क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी जितेश कदम, मनोज शिंदे-म्हैसाळकर, संभाजी पाटील, दिलीप बुरसे, गजानन शिंदे आदी उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
टाकळी : माजी मंत्री मदन पाटील यांच्या जयंतीनिमित्त बेडग येथे ग्रामीण प्रीमीयर लीग क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. उद्घाटन मोहनराव शिंदे साखर कारखान्याचे अध्यक्ष मनोज शिंदे - म्हैसाळकर व काँग्रेस नेते जितेश कदम यांच्याहस्ते झाले. युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अध्यक्ष संभाजी पाटील यांच्या पुढाकाराने राजे क्लबने आयोजन केले आहे.
यावेळी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मंगेश चव्हाण, मिरज पंचायत समितीचे माजी सभापती दिलीप बुरसे, मसाजी कांबळे, उमेश पाटील, गजानन शिंदे, आनंद लेंगरे, सुजित लकडे, बाळासाहेब नलवडे, कलगोंड पडसलगे, समर कागवाडे, रवी मगदूम, श्रीनाथ देवकर, स्वराज पाटील, अमोल पाटील, टाकळी ग्रामपंचायतीचे सदस्य सुनील गुळवणी, जिल्हा परिषद सदस्य मनोज मुंडगणूर, विष्णू पाटील, दिलीप शेगणे, अजय मोरे, राजू माळी, दिलीप जाधव, सचिन जाधव, सूरज आवटी, वैभव पाटील, अमित पाटील, भालचंद्र आवटी, कैलास रजपूत, उदय पाटील, संजय पाटील, सुनील पाटील, परशराम गायकवाड, भानुदास कोकरे, विनोद बुरुड आदी उपस्थित होते.
या फुल पीच टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा १० डिसेंबरपर्यंत चालणार आहेत. पहिली चार बक्षिसे २५ हजार, १५ हजार १० हजार व ५ हजार रुपयांची आहेत. याशिवाय सामनावीर, मालिकावीर, उत्कृष्ट क्षेत्ररक्षण, गोलंदाज फलंदाज आदी बक्षिसेही आहेत.
-----