शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
5
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
6
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
7
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
8
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
9
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
10
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
11
आयोग नव्हे, मतदारच राजा !
12
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
13
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
14
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
15
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
16
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
17
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
18
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
19
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
20
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी

Sangli News: शेततळ्यात गव्याने घेतला वॉटरपार्कचा आनंद, मनसोक्त केले स्वीमिंग -video

By संतोष भिसे | Updated: March 13, 2023 19:18 IST

ऊसपट्ट्यात आढळणारा गवा दुष्काळी शेतकऱ्यांसाठी कुतुहलाचा ठरला, पण त्यांनी कोणताही अतिउत्साह न दाखवता गव्याला त्याच्या मार्गाने जाण्यास मोकळीक दिली

सांगली : रणरणत्या उन्हात तो आला, त्यानं शेततळं पाहिलं आणि थेट पाण्यात उडी घेतली. मनसोक्त स्वीमिंग केलं, आणि आल्यापावली परतला. गेल्या तीन दिवसांत तासगाव, कवठेमहांकाळ व जतच्या दुष्काळी पट्ट्यात शेतकऱ्यांना दर्शन दिलेल्या गव्याने डोंगरसोनी (ता. तासगाव) येथे शेततळ्यात यथेच्छ डुंबण्याचा मुक्त आनंद लुटला.मंगळवेढ्याकडून जत तालुक्यात शिरलेल्या गव्याने कुंभारीतून कवठेमहांकाळकडे कूच केले. यादरम्यान अनेकांना तो दिसला. कोणालाही उपद्रव मात्र केला नाही. लोकांनी कळवल्यानंतर वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी ठिकठिकाणी त्याच्या मागावर राहिले. पाच-सात द्राक्षबागांतून घुसला, पण बागेची नासधूस केली नाही. एरवी ऊसपट्ट्यात आढळणारा गवा दुष्काळी शेतकऱ्यांसाठी कुतुहलाचा ठरला, पण त्यांनी कोणताही अतिउत्साह न दाखवता गव्याला त्याच्या मार्गाने जाण्यास मोकळीक दिली. त्यामुळे त्याचा प्रवास शांतपणे सुरु राहिला.रणरणत्या उन्हात त्याने शनिवारी डोंगरसोनीमध्ये (ता. तासगाव) प्रवेश केला. तेथे विजय झांबरे या शेतकऱ्याच्या शेततळ्याने त्याला मोहवले. डोक्यावर कडक उन्हे आणि समोर थंडगार पाणी पाहून राहवले नाही. तळ्यातील थंडगार पाणी पिले. लोकांना न जुमानता थेट तळ्यात उडी घेतली. मनसोक्त स्नान केले. त्यानंतर आपल्याच मस्तीत थंडावलेल्या अंगाने तळ्यातून बाहेर पडला.झांबरे यांनी मोबाईलमध्ये त्याच्या स्विमिंगचे चित्रण केले. तळ्याच्या कागदावरुन बाहेर पडणे त्याला काहीसे मुश्किल झाले, पण वजनदार देहामुळे आधार मिळत गेला. कागद फाटण्याची किंवा तळ्याच्या नासधुशीची चिंता झांबरे यांना होती, पण तसे काही झाले नाही. रविवारी गवा मंगळवेढ्याकडे परतीच्या मार्गावर गेल्याचे लोकांनी पाहिले.

टॅग्स :Sangliसांगली