नांद्रेत पुतण्याकडून चुलतीला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:18 IST2021-07-02T04:18:29+5:302021-07-02T04:18:29+5:30

सांगली : नांद्रे (ता. मिरज) येथे मोटार भाड्याने देण्याच्या कारणावरून पुतण्याने चुलतीला बेदम मारहाण केल्याची घटना घडली. या प्रकरणी ...

Cousin beaten by nephew in Nandra | नांद्रेत पुतण्याकडून चुलतीला मारहाण

नांद्रेत पुतण्याकडून चुलतीला मारहाण

सांगली : नांद्रे (ता. मिरज) येथे मोटार भाड्याने देण्याच्या कारणावरून पुतण्याने चुलतीला बेदम मारहाण केल्याची घटना घडली. या प्रकरणी शैलजा रावसाहेब पाटील (३७) यांनी भारत बाळासाहेब पाटील (रा. नांद्रे) याच्या विरोधात सांगली ग्रामीण पोलिसांत फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, नांद्रे येथील आदिनाथनगर परिसरात फिर्यादी पाटील राहण्यास आहेत. त्यांची मोटार भाड्याने नेली होती. त्या गाडीचे भाडे पाटील यांनी दिले नव्हते. मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास संशयित भारत हा शैलजा यांच्या घरी आला व त्याने भाडे देण्यावरून शिवीगाळ सुुरू केली. यावेळी शैलजा घरात स्वयंपाक करीत होत्या. त्यांना मारहाण करून गॅसवर ढकलून दिले. यात त्या जखमी झाल्या. त्यानंतर त्यांनी सांगली ग्रामीण पोलिसांत फिर्याद दाखल केली. त्यानुसार संशयितावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Cousin beaten by nephew in Nandra