शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

उद्योजकांना दिलासा; जीएसटीच्या नोटीस न्यायालयाकडून रद्द, उच्च न्यायालयाचा निर्णय 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2025 18:19 IST

म्हणून ते जीएसटीच्या कक्षेबाहेर..

कुपवाड : भाडेपट्टा हक्क हस्तांतरणावरील जीएसटी मागणी मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केली. यावेळी मूळ आदेश जारी करणाऱ्या जीएसटी अधिकाऱ्यांना या विषयांवरील अलीकडील गुजरात उच्च न्यायालयाच्या आदेशाचा विचार करून नवीन आदेश जारी करण्यास न्यायालयाकडून सांगण्यात आले.महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने दिलेला भूखंड त्यांच्या मूळ वाटपकर्त्यांकडून थर्ड पार्टीला हस्तांतरित करण्यावर कर वसुलीसाठी जीएसटी विभागाने नोटीस जारी केली. मुंबई उच्च न्यायालयाने तो निर्णय रद्द केला. तसेच, गुजरात उच्च न्यायालयाच्या अलीकडील निर्णयाचा विचार करून मूळ आदेश जारी करणाऱ्या जीएसटी अधिकाऱ्यांनी नवीन आदेश जारी करण्याचे निर्देश दिले.या प्रकरणात भाडेपट्टा देणाऱ्या पॅनासिया बायोटेकने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) कडून नवी मुंबईतील महापे परिसरात जमीन भाडेपट्ट्यावर घेतली होती. त्यानंतर ती जमीन तसेच त्यावरील इमारत ही थर्ड पार्टीला हस्तांतरित केली होती. याचिकाकर्त्या पॅनासिया बायोटेकने असा युक्तिवाद केला की, हा व्यवहार जीएसटी कायद्यांतर्गत वर्गीकृत असून त्यामुळे जमीन आणि इमारतीच्या विक्री व्यवहारास जीएसटीमधून सवलत आहे.

म्हणून ते जीएसटीच्या कक्षेबाहेर..जमीन आणि इमारतींची विक्री जीएसटीच्या व्याप्तीतून वगळण्यासाठी कायदा आहे. ज्यामध्ये असे व्यवहार जीएसटीच्या कक्षेबाहेर राहतील याची खात्री करण्यासाठी विशिष्ट तरतुदी आहेत. जमिनीच्या विक्रीसारखे हे व्यवहार देखील जीएसटीच्या कक्षेबाहेर असले पाहिजेत, असा याचिकाकर्त्याच्या वकिलांनी न्यायालयासमोर युक्तिवाद केला. मुंबई उच्च न्यायालयाने असा निर्णय दिला की, असे व्यवहार स्थावर मालमत्तेचे हस्तांतरण आहेत, सेवा नाही आणि म्हणून ते जीएसटीच्या कक्षेबाहेर येतात. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाने उद्योजकांना दिलासा मिळणार असल्याचे उद्योजकांमधून बोलले जात आहे.

गुजरात न्यायालयाच्या निर्णयाला उत्तर..गुजरात उच्च न्यायालयाने अलीकडच्या एका निर्णयात औद्योगिक विकास महामंडळाने विकसित केलेल्या औद्योगिक भूखंडांसाठी भाडेपट्टा अधिकाऱ्यांना जीएसटी आकारणीतून वगळले आहे. गुजरात औद्योगिक विकास महामंडळाने भूखंडांसाठी भाडेपट्टा अधिकारांचे हस्तांतरण जीएसटी कायद्यांतर्गत ‘पुरवठा’ म्हणून पात्र आहे की, नाही या मुद्द्याला या निकालाने उत्तर दिले आहे.

टॅग्स :SangliसांगलीGSTजीएसटीHigh Courtउच्च न्यायालय