शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाला वर्ष होण्यापुर्वीच नवदाम्पत्याने संपवले जीवन, कारण अस्पष्ट; सांगलीतील येळावी येथील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2023 16:27 IST

घटनेने परिसरात उडाली खळबळ

तासगाव : येळावी (ता. तासगाव) येथील राज संजय जाधव (वय २३) आणि त्यांची पत्नी ऋतुजा राज जाधव (वय २०) या नवविवाहित दाम्पत्याने विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली. बुधवारी मध्यरात्री हा प्रकार घडला. ऋतुजा आणि राज यांचा अकरा महिन्यांपूर्वी विवाह झाला होता. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून याबाबत तासगाव पोलिसांत नोंद झाली आहे.राज आणि ऋतुजा यांचा अकरा महिन्यांपूर्वी विवाह झाला होता. ऋतुजाचे माहेर सावर्डेतर्फे असंडोली (ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर) येथील आहे. राज यांच्या घरी आई-वडील आणि लहान भाऊ असा परिवार आहे. बुधवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास राज उलट्या करताना आवाज आल्याने घरातील नातेवाईक जागे झाले. त्यांनी खोलीचा दरवाजा उघडल्यानंतर राज उलट्या करत असल्याचे दिसून आले, तर ऋतुजा निपचित पडली होती. त्यानंतर कुटुंबीयांनी दोघांनाही तात्काळ तासगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यासाठी नेले. तिथून तासगाव ग्रामीण रुग्णालयात नेले. मात्र, उपचारापूर्वीच दोघांचेही निधन झाले होते.अवघ्या अकरा महिन्यांपूर्वीच राज आणि ऋतुजा यांचा विवाह झाल्यानंतर दोघांनीही आत्महत्या केल्यामुळे परिसरात खळबळ उडाली होती. आत्महत्येचे नेमके कारण समजले नाही. याबाबत तासगाव पोलिसात नोंद करण्यात आली असून प्राथमिक तपास बजरंग थोरात करत आहेत.

येळावीत हळहळराज जाधव निर्व्यसनी व कष्टाळू होता. गुरुवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास येळावी येथे दोघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी ऋतुजाच्या माहेरचे नातेवाईकदेखील उपस्थित होते. मात्र, दोघांच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारी