शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

दाम्पत्याचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2018 19:29 IST

शेतजमिनीबाबत झालेल्या अन्यायाविरोधात पोलिसांकडे दाद मागूनही न्याय मिळत नसल्याच्या निषेधार्थ सोमवारी करोली (एम) ता. मिरज येथील मनोहर राघू घोडके व शालन मनोहर घोडके या दापंत्याने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात अंगावर रॉकेल ओतून घेत पेटवुन घेण्याचा प्रयत्न केला.

सांगली -  शेतजमिनीबाबत झालेल्या अन्यायाविरोधात पोलिसांकडे दाद मागूनही न्याय मिळत नसल्याच्या निषेधार्थ सोमवारी करोली (एम) ता. मिरज येथील मनोहर राघू घोडके व शालन मनोहर घोडके या दापंत्याने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात अंगावर रॉकेल ओतून घेत पेटवुन घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी बंदोबस्तास असणा-या पोलीस कर्मचा-यांने प्रसंगावधान राखत घोडके यांना रोखल्याने पुढील अनर्थ टळला. अचानक घडलेल्या प्रकाराने कार्यालयात धावपळ उडाली होती.कार्यालयाच्या पायºयाजवळच हा प्रकार झाला. मात्र, पोलीस कर्मचा-याचे वेळीच या प्रकाराकडे लक्ष गेल्याने त्याने घोडके यांच्याकडून काडेपेटी काढून घेत त्यांना समाजवण्याचा प्रयत्न केला.     मनोहर घोडके यांनी सांगितले की, ते कुटुंबासह करोली एम येथे राहण्यास आहे. गावच्या हद्दीतच घोडके यांची जमिन आहे. नंदकुमार घोडके यांनी मिरज तहसिलदार यांना चुकीची माहीती देत ३० मे २०१७ रोजी सात बाराला मनोहर घोडके यांची नावे कमी करून आपले नाव लावून घेतले आहे. त्यानंतर ही जमिन सुनिल पाटील व अन्य लोकांच्या नावावर खरेदी पत्र करून विकली आहे. सातबाराला आपले नाव कमी करताना आपल्याला कोणतीही नोटीस न देता, माहीती न देता उद्योग करण्यात आला आहे. याबाबत घोडके यांनी मिरज न्यायालय तसेच मुंबई उच्च न्यायालयात दावा सुरू आहे. दरम्यानच्या काळात नंदकुमार घोडके यांनी आमच्या मालकीची ही जमिन आमच्या परस्पर गावातील सुनिल सुदाम पाटील व अन्य लोकांना विकली असल्याची तक्रार मनोहर घोडके यांंनी मिरज ग्रामीण पोलिस व अन्य आवश्यक ठिकाणी दिली आहे. याबाबत वारंवार तक्रार देऊनही कोणतीच कार्यवाही केली जात नसल्याची घोडके दाम्पत्यांची तक्रार आहे. याबाबत त्यांनी मुख्यमंत्र्यांनाही निवेदन सादर केले असल्याची सांगितले. दाम्पत्यांवर गुन्हा?कोणतीही पूर्वसूचना न देता घोडके दाम्पत्याने अचानक जिल्हाधिकारी कार्यालयात येत पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. थोड्यावेळाने विश्रामबाग पोलीसांचे एक पथक कार्यालयात दाखल झाले व त्यांनी दोघांना समजावून सांगत शांत केले. त्यानंतर चौकशीसाठी त्यांना ठाण्यात नेण्यात आले. आत्मदहनाबद्दल दांम्पत्यावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :SangliसांगलीMaharashtraमहाराष्ट्र