मतमोजणी : तीन ठिकाणी तपासणी कडक बंदोबस्त : सांगली, मिरजेत १२ जागी नाकाबंदी

By Admin | Updated: May 16, 2014 00:03 IST2014-05-15T23:58:35+5:302014-05-16T00:03:35+5:30

सांगली : लोकसभा निवडणुकीची उद्या (शुक्रवार) मिरजेतील वेअर हाऊसमध्ये मतमोजणी असल्याने याठिकाणी कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

Counting of votes: Strict checking in three places: Blockade of 12 places in Sangli, Mirzaj | मतमोजणी : तीन ठिकाणी तपासणी कडक बंदोबस्त : सांगली, मिरजेत १२ जागी नाकाबंदी

मतमोजणी : तीन ठिकाणी तपासणी कडक बंदोबस्त : सांगली, मिरजेत १२ जागी नाकाबंदी

सांगली : लोकसभा निवडणुकीची उद्या (शुक्रवार) मिरजेतील वेअर हाऊसमध्ये मतमोजणी असल्याने याठिकाणी कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मतमोजणी केंद्राच्या मुख्य प्रवेशद्वारापासून आत जाईपर्यंत तीन ठिकाणी पोलिसांकडून तपासणी केली जाणार आहे, अशी माहिती जिल्हा पोलीसप्रमुख दिलीप सावंत यांनी दिली. सांगली, मिरज, तासगाव व कवठेमहांकाळ येथे कडक बंदोबस्त तैनात केला आहे. सांगली, मिरजेत १२ ठिकाणी नाकाबंदीचे पॉर्इंट लावले आहेत, असेही त्यांनी सांगितले. मतमोजणी केंद्रात पोलीस निरीक्षक, तीन सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्या नेतृत्वाखाली सव्वाशे पोलीस कर्मचारी तैनात केले आहेत. वेअर हाऊसच्या मुख्य प्रवेशद्वारावर सहाय्यक पोलीस निरीक्षक यांचे पथक तैनात केले आहे. हे पथक ज्यांच्याकडे पास आहे, त्यांनाच आत सोडणार आहे. पासधारकांची कडक तपासणी केली जाणार आहे. आत मोबाईल नेण्यास बंदी आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Counting of votes: Strict checking in three places: Blockade of 12 places in Sangli, Mirzaj