विलासराव शिंदे विलगीकरण केंद्रात वसंत हंकारे यांचे समुपदेशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:33 IST2021-06-09T04:33:15+5:302021-06-09T04:33:15+5:30

आष्टा : येथील विलासराव शिंदे विलगीकरण केंद्रात शिवसम्राट फाउंडेशनच्या वतीने कोरोना रुग्णांसाठी वसंत हंकारे यांनी समुपदेशन केले. यावेळी ...

Counseling of Vasant Hankare at Vilasrao Shinde Separation Center | विलासराव शिंदे विलगीकरण केंद्रात वसंत हंकारे यांचे समुपदेशन

विलासराव शिंदे विलगीकरण केंद्रात वसंत हंकारे यांचे समुपदेशन

आष्टा : येथील विलासराव शिंदे विलगीकरण केंद्रात शिवसम्राट फाउंडेशनच्या वतीने कोरोना रुग्णांसाठी वसंत हंकारे यांनी समुपदेशन केले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य विशाल चौगुले, डॉ. जयानंद नलवडे, अभिनंदन चौगुले उपस्थित होते. वसंत हंकारे यांनी कोरोना रुग्णांची हास्य योगा डान्सची प्रात्यक्षिके घेतली.

डॉ. नलवडे यांनी संमोहनाच्या माध्यमातून रुग्णांचा आत्मविश्वास वाढविला. यावेळी आष्टा शहर विकास आघाडीचे नेते वैभव शिंदे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य झुंजारराव पाटील, काँग्रेसचे नेते विनय कांबळे उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन शिवसम्राट फाउंडेशनने केले हाेते. यावेळी शिवसम्राट फाउंडेशनचे महेश गायकवाड, श्रीराम ढोले, अनिकेत ढोले, सुशांत हिरुगडे, सुदीप हालुंडे, चेतन मोहिते, उत्तम सिद्ध उपस्थित होते. पालिका अधिकारी सचिन मोरे, आष्टा नगर परिषद आष्टा, ग्रामीण रुग्णालय आष्टा व आष्टा डॉक्टर असोसिएशन यांचे सहकार्य लाभले.

Web Title: Counseling of Vasant Hankare at Vilasrao Shinde Separation Center