शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

सांगलीत आयुक्तांविरोधात नगरसेवकांचा हल्लाबोल, सभा १८ पर्यंत तहकूब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2017 15:00 IST

सांगली महापालिकेचे आयुक्त रवींद्र खेबूडकर यांच्यावर एकाधिकारशाहीचा आरोप करीत मंगळवारी महासभेत त्यांना शासनाकडे परत पाठविण्याची मागणी करण्यात आली. अमृत योजनेत भ्रष्टाचार असल्याने प्रशासनाने घाईगडबडीने ठेकेदाराला वर्कआॅर्डर दिली आहे. त्यात कुणाचा इंटरेस्ट आहे? त्यांच्या काळात सर्वाधिक बेकायदेशीर कारभार झाल्याचा गंभीर आरोपही करीत नगरसेवकांनी त्यांच्या गैरहजेरीत हल्लाबोल केला. अखेर आयुक्त येईपर्यंत महासभाच तहकूब ठेवण्यात आली.

ठळक मुद्देप्रशासनाने घाईगडबडीने ठेकेदाराला वर्कआॅर्डर दिली, अमृत योजनेत इंटरेस्ट कुणाचा ? सध्याचा कारभार सर्वात बेकायदेशीरशासनाकडे परत पाठवा, विष्णू माने यांनी चढविला आयुक्तांवर हल्ला अब्रूनुकसानीचा दावा करणार : खेबूडकर

सांगली : महापालिकेचे आयुक्त रवींद्र खेबूडकर यांच्यावर एकाधिकारशाहीचा आरोप करीत मंगळवारी महासभेत त्यांना शासनाकडे परत पाठविण्याची मागणी करण्यात आली. अमृत योजनेत भ्रष्टाचार असल्याने प्रशासनाने घाईगडबडीने ठेकेदाराला वर्कआॅर्डर दिली आहे. त्यात कुणाचा इंटरेस्ट आहे? त्यांच्या काळात सर्वाधिक बेकायदेशीर कारभार झाल्याचा गंभीर आरोपही करीत नगरसेवकांनी त्यांच्या गैरहजेरीत हल्लाबोल केला. अखेर आयुक्त येईपर्यंत महासभाच तहकूब ठेवण्यात आली.

महापौर हारुण शिकलगार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत आयुक्त रवींद्र खेबूडकर यांना सदस्यांनी टार्गेट केले होते. घनकचरा प्रकल्पातील कारभाराचा पोलखोल झाल्यानंतर स्थायी समिती सभापती बसवेश्वर सातपुते यांनी मिरजेतील अमृत योजनेच्या निविदेचे इतिवृत्त मंजूर केले नसताना, प्रशासनाने ठेकेदाराला वर्कआॅर्डर कशी दिली, असा सवाल केला.

त्यावर उपायुक्त पाटील यांनी आयुक्तांच्या अनुपस्थितीत आपल्याला सहीचे अधिकार दिले होते. त्या काळात अमृत योजनेची वर्कआॅर्डर दिली आहे. बाकी मला काही माहीत नाही, असे म्हणत हा विषय टाळण्याचा प्रयत्न केला. सातपुते यांनी उद्या आयुक्त महापालिका विकण्याचा प्रस्ताव देतील, त्यावरही सही करणार का? असा जाब विचारला.

हा धागा पकडत विष्णू माने यांनी आयुक्तांवर हल्ला चढविला. ते म्हणाले की, दोन-दोन लाखाच्या फायलीवर सह्या करताना आयुक्त अनेक शेरेबाजी करतात, मग सव्वाशे कोटींच्या फायलीवर सह्या कशा केल्या? आयुक्तांना ज्या कामात इंटरेस्ट आहे, अशाच कामावर सह्या होतात. ते हुकूमशाही पद्धतीने कारभार करीत आहेत.

उद्यान, अमृत योजना, ड्रेनेज योजनेत स्थायी, महासभेची मान्यता न घेता परस्पर बिले दिली जात आहेत. उद्यान विकासासाठी स्थायी, महासभेची मान्यता न घेता साडेचार कोटींची निविदा काढली आहे. आमच्या फायलींवर शेरे मारताना त्यांच्या हाताला लकवा मारतो; पण त्यांच्या इंटरेस्टच्या फायलींवर मात्र सुटीदिवशीही सह्या होतात.

अमृत योजनेत भ्रष्टाचार झाल्यानेच घाईगडबडीत वर्कआॅर्डर देण्यात आली. नव्या अलिशान गाड्या मात्र रातोरात ऐनवेळीच्या ठरावात खरेदी केल्या जातात. आतापर्यंत महापालिकेच्या इतिहासात सर्वात बेकायदेशीर व घोटाळेबाज कारभार खेबूडकर यांच्या काळात झाला असल्याचा आरोपही माने यांनी केला.

शेखर माने म्हणाले की, अमृत योजनेच्या जादा दराच्या निविदेमुळे १२ कोटीचा बोजा जनतेवर पडणार आहे. महासभा, स्थायी समितीने जादा दराच्या निविदेला मान्यता दिलेली नाही. मग बारा कोटीची जबाबदारी कुणाची? असा सवाल त्यांनी केला. त्यावर महापौरांनी, वर्कआॅर्डरवर सह्या केलेल्या अधिकाऱ्यांकडून ही रक्कम वसूल होईल, असा टोला लगाविला.यावेळी विरोधी पक्षनेते शेडजी मोहिते, दिग्विजय सूर्यवंशी यांनीही, विकास कामांच्या फायलींवर आयुक्त सह्याच करीत नाहीत. आयुक्त महासभेस हजर राहत नसतील, तर या चर्चेला काय अर्थ आहे? आयुक्त येईपर्यंत महासभा तहकूब ठेवावी, अशी मागणी केली. त्यावर महापौर शिकलगार यांनी, १८ डिसेंबरपर्यंत महासभा तहकूब ठेवण्याचे आदेश दिले.

नगरसेविका रोहिणी पाटील, संतोष पाटील यांनी, ट्रक पार्किंगसाठीच्या प्रस्तावाची फाईलच गायब असल्याचा प्रकार उघडकीस आणला. महापौरांनी याची गंभीर दखल घेत संबंधितावर फौजदारी दाखल करण्याचे आदेश दिले.

अब्रूनुकसानीचा दावा करणार : खेबूडकरमहासभेत माझ्यावर वैयक्तिक पातळीवर नगरसेवकांनी टीका केली. त्यांनी एक तरी घोटाळा दाखवून द्यावा. माझ्यासह आयुक्तपदाचा अवमान केला असून, घोटाळ्याचा आरोप करणाऱ्या नगरसेवकाविरोधात आपण अब्रूनुकसानीचा दावा ठोकणार असल्याचे आयुक्त रवींद्र खेबूडकर यांनी सांगितले.

महापालिकेचे उत्पन्न व खर्च याचा ताळमेळ घालून विकासकामे केली जात आहेत. उत्पन्नापेक्षा अधिकची कामे आतापर्यंत मंजूर झाली आहेत. आणखी कामे मंजूर केल्यास महापालिकेची आर्थिक घडी विस्कटेल. महत्त्वाच्या व जनतेच्या हिताच्या कामांना प्राधान्य दिले आहे.

काहीजण वैयक्तिक स्वार्थातून टीकाटिप्पणी करीत असले तरी, माझ्या कामाची पद्धत सांगलीकरांना माहीत आहे. पण नाहक बदनामी करणाऱ्यांना चाप लावण्यासाठी आपण पाऊल उचलणार असल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :SangliसांगलीMuncipal Corporationनगर पालिका