मनपा शाळेत सॅनिटरी व्हेंडिंग यंत्रणा उभारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:22 IST2021-02-05T07:22:28+5:302021-02-05T07:22:28+5:30

सांगली : महापालिकेच्या शाळांमध्ये सॅनिटरी व्हेंडिंग मशीन बसवण्याचा निर्णय बुधवारी महिला बालकल्याण समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. शालेय मुलींसाठी ...

Corporation will set up sanitary vending system in schools | मनपा शाळेत सॅनिटरी व्हेंडिंग यंत्रणा उभारणार

मनपा शाळेत सॅनिटरी व्हेंडिंग यंत्रणा उभारणार

सांगली : महापालिकेच्या शाळांमध्ये सॅनिटरी व्हेंडिंग मशीन बसवण्याचा निर्णय बुधवारी महिला बालकल्याण समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. शालेय मुलींसाठी कराटे प्रशिक्षणाबरोबर समुदेशन केंद्रही सुरू करण्यात येणार असल्याचे सभापती गीतांजली ढोपे पाटील यांनी सांगितले.

महापालिकेत महिला व बालकल्याण समिती सभा पार पडली. सभेस सभापती गीतांजली ढोपे पाटील, नगरसचिव चंद्रकांत आडके, विभागप्रमुख अशोक माणकापुरे यांच्यासह सर्व महिला सदस्य या सभेला उपस्थित होत्या. या सभेत मुलींसाठी कराटे प्रशिक्षण, समुपदेशन केंद्र उभारणे, महिलांची रिक्त पदे भरणे, तक्रार निवारण कक्ष सुरू करणे, शाळांमध्ये मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे उभारणे, महिलांसाठी प्रशिक्षण, प्रसूतिगृहाची सुधारणा, महिला बचत गटांना महापालिकेची कामे देणे, ९ वी ते १२ वीच्या विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती, महिलांसाठी महापालिकेत स्वतंत्र विश्रांती कक्ष उभारणे आदी निर्णय घेण्यात आले.

Web Title: Corporation will set up sanitary vending system in schools

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.