Coronavirus Unlock : तासगाव शहरात १० जुलैपर्यंत शटरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2020 04:48 PM2020-07-03T16:48:09+5:302020-07-03T16:50:10+5:30

तासगाव तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या २० वर पोहोचली आहे. यामुळे खबरदारी म्हणून तासगाव शहर १० जुलैपर्यंत बंद ठेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नागरिकांनी यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्ष, सर्व नगरसेवक, नगरपरिषद व शहर सर्वपक्षीय कोरोना सुरक्षा समितीने केले आहे.

Coronavirus Unlock: Shutters in Tasgaon till July 10 | Coronavirus Unlock : तासगाव शहरात १० जुलैपर्यंत शटरबंद

Coronavirus Unlock : तासगाव शहरात १० जुलैपर्यंत शटरबंद

Next
ठळक मुद्देतासगाव शहरात १० जुलैपर्यंत शटरबंदनागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन

तासगाव : तासगाव तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या २० वर पोहोचली आहे. यामुळे खबरदारी म्हणून तासगाव शहर १० जुलैपर्यंत बंद ठेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नागरिकांनी यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्ष, सर्व नगरसेवक, नगरपरिषद व शहर सर्वपक्षीय कोरोना सुरक्षा समितीने केले आहे.

तासगाव तालुक्यातील वाघापूर येथील २२ वर्षीय महिलेचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. तिच्या संपर्कात आलेल्या सहा जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामध्ये एका खासगी रुग्णालयातील चार कर्मचारी, सोनोग्राफी सेंटरमधील एक तंत्रज्ञ व बोरगाव (ता. तासगाव) येथील एका महिलेचा समावेश आहे. सध्या तासगाव शहरात सहा, तर वाघापूर, बोरगाव, गव्हाण, शिरगाव, वायफळे व पेड आदी गावात १४ असे २० रुग्ण आढळून आले आहेत.

या सर्वांच्या संपर्कातील लोकांचा शोध सुरू आहे. अनेकांचे स्राव तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. त्याचा अहवाल प्रलंबित आहे. सावळज व तासगाव येथील रुग्णालयातील डॉक्टरांचा तपासणी अहवाल निगेटिव्ह आला आहे.

दरम्यान, शहरात अचानक कोरोनाचे रुग्ण सापडल्याने ठिकठिकाणी कंटेनमेंट झोनची अंमलबजावणी करण्यात आली आहे. मुख्य रस्ता वगळता इतर सर्व मार्ग बंद करण्यात आले आहेत.

दरम्यान, जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी तातडीने तासगाव तहसील कार्यालयात बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. शहरात आरोग्य विभागाला सर्वेक्षण करण्याच्या सूचना दिल्या. पोलिसांना कंटेनमेंट झोनची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले होते.

शहरातील सर्व नागरिक, व्यावसायिकांना नगराध्यक्ष, सर्व नगरसेवक, तसेच तासगाव शहर सर्वपक्षीय कोरोना सुरक्षा समितीने आवाहन केले आहे. कोरोनाचा संसर्ग वाढलेला असल्याने दि. १० जुलैपर्यत संपूर्ण लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Web Title: Coronavirus Unlock: Shutters in Tasgaon till July 10

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.