शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
2
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
3
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
4
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
5
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
6
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
7
भारतातील या मुख्यमंत्र्यांनी भारत-पाकिस्तान युद्धावेळी चालवलं होतं विमान, सैनिकांना पोहोचवलं होतं श्रीनगरला
8
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी
9
एजाज खान अडचणीत, महिला आयोगाची कारवाई; ULLU ने 'हाउस अरेस्ट'चे सर्व एपिसोड हटवले
10
सौरभची हत्या करणाऱ्या मुस्कान-साहिलने हात जोडले; जेलमध्ये ढसाढसा रडले अन् म्हणाले...
11
आई, वडील आयटी प्रोफेशनल; काळजावर दगड ठेवत अवघ्या तीन वर्षांच्या मुलीला दिला जैन धर्माचा संथारा, कहाणी ऐकून व्हाल भावूक...
12
Gold Rates 2 May : सोन्याच्या किंमतीत जोरदार घसरण, ७८ हजारांपर्यंत येऊ शकतो १० ग्रॅम सोन्याचा दर?
13
अधिकाधिक हिंदू तरुणींवर बलात्कार करण्याचं होतं लक्ष्य, भोपाळ लव्ह जिहाद प्रकरणातील आरोपीचा धक्कादायक दावा 
14
पहलगाम हल्ल्याचा दणका! भारताकडून पाकिस्तानचा ऑलिम्पिक विजेता अर्शद नदीम BLOCK!!
15
वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर दिल्ली पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप 
16
Waves Summit 2025: "भारतात पुरेसे सिनेमागृहच नाहीत..." आमिर खानने व्यक्त केली खंत
17
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!
18
केवळ १००० रुपयांनी गुंतवणूक करून तुमच्या मुलांना बनवू शकता कोट्यधीश; कोणती आहे ही स्कीम?
19
पत्नी माहेरी गेली, पतीने घरातच केली आत्महत्या; अकोला जिल्ह्यातील धक्कादायक घटना
20
प्रेक्षकांचा सूरज चव्हाणला 'गोलीगत धोका', 'झापुक झुपूक'ने पहिल्या आठवड्यात केली फक्त इतकी कमाई

CoronaVirus :जिल्ह्यात प्लाझ्मा थेरपी सुरू होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2020 16:44 IST

वाढतच चाललेल्या कोरोना संसर्गावर मात करण्यासाठी व बाधित रूग्णांवर तातडीने उपचार करण्यासाठी प्रशासनाने प्राधान्य दिले आहे. त्यानुसार कोरोनाबाधितांवर प्लाझ्मा उपचार पध्दतीचा अवलंब करण्यासाठी प्रशासकीय पातळीवरील परवानगी घेण्याची प्रक्रीया सुरू आहे. ती अंतिम टप्प्यात असून आठवडाभरात जिल्ह्यात प्लाझ्मा उपचारपध्दतीने कोरोनाबाधितांवर उपचार सुरू होतील, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दिली.

ठळक मुद्देजिल्ह्यात आठवडाभरात प्लाझ्मा थेरपी सुरू होणार : अभिजित चौधरी कोरोनाबाधितांवर अत्याधुनिक उपचार

सांगली : वाढतच चाललेल्या कोरोना संसर्गावर मात करण्यासाठी व बाधित रूग्णांवर तातडीने उपचार करण्यासाठी प्रशासनाने प्राधान्य दिले आहे. त्यानुसार कोरोनाबाधितांवर प्लाझ्मा उपचार पध्दतीचा अवलंब करण्यासाठी प्रशासकीय पातळीवरील परवानगी घेण्याची प्रक्रीया सुरू आहे. ती अंतिम टप्प्यात असून आठवडाभरात जिल्ह्यात प्लाझ्मा उपचारपध्दतीने कोरोनाबाधितांवर उपचार सुरू होतील, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दिली.जिल्हाधिकारी डॉ. चौधरी म्हणाले, कोरोनाचे निदान झालेल्या रूग्णांवर अत्याधुनिक पध्दतीने उपचार करण्याबाबत पालकमंत्री जयंत पाटील यांनी निर्देश दिले होते. त्यानुसार कोरोनातून पूर्णपणे बरा झालेल्या व्यक्तीच्या रक्तातील प्लाझ्मा हा घटक संकलीत करून त्याचा वापर करून बाधित रूग्णांवर उपचार केले जाणार आहेत.

कोरोनामुळे अस्तवस्थ बनलेल्या रूग्णांवर हा उपचार अधिक प्रभावी ठरणार असल्याने त्यासाठी लागणार्‍या परवानगीची प्रक्रीया सुरू करण्यात आली होती. आरोग्य विभागाच्यावतीने याबाबत काम सुरू केले असून येत्या चार ते पाच दिवसात परवानगी व इतर प्रक्रीया पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्षात उपचार सुरू होणार आहेत.प्लाझ्मा उपचार पध्दतीसाठी लागणारी सर्व ती साधनसाम्रगी मिरज येथील कोविड रूग्णालयात उपलब्ध झाली आहे. त्यामुळे आठवडाभरात या उपचारपध्दतीचा अवलंब होण्यास अडचण नाही. या उपचारपध्दतीमध्ये कोरोना मुक्त झालेल्या रूग्णाची आवश्यकता असल्याने प्रशासनातर्फे त्यांच्याशी संपर्क साधला जात आहे.जिल्ह्याबाहेरून आलेल्या व्यक्तीच कोरोनाबाधित आढळून येत असल्याने आता बाहेरून येणार्‍यांवर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे. त्यामुळे क्वारंटाईनमध्ये असलेले व प्रवासाचा इतिहास असलेल्या व्यक्तीची तपासणी तातडीने घेण्यात येत आहे.जिल्ह्यातील साळशिंगे येथील अहमदाबाद वगळता इतर सर्वजण बाधित मुंबईहूनच आलेले असल्याने मुंबई,पुणे येथून येणार्‍या प्रवाशांवर लक्ष ठेवण्याचे निर्देश देण्यात आले असल्याचेही जिल्हाधिकार्‍यांनी सांगितले.काय आहे प्लाझ्मा थेरपी?कोणत्याही आजारात चिंताजनक प्रकृती असलेल्या अथवा व्हेंटीलेटरवर असलेल्या रूग्णावर याचा उपयोग केला जातो. कोरोनाबाबतही प्लाझ्मा थेरपीचा वापराबाबत संशोधन झाले आहे. यात कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तीच्या रक्तातील प्लाझ्मा घेऊन त्याचा इतर रूग्णांवर केला जातो. पहिल्या रूग्णांमध्ये तयार होणार्‍या प्रतीजैवकांमुळे दुसर्‍या रूग्णातील संसर्ग कमी होण्याची शक्यता असल्याने प्लाझ्मा उपचारपध्दती कोरोना रूग्णांवर प्रभावी ठरू शकत असल्याचा तज्ज्ञांचा अंदाज आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSangliसांगली