शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News : दहा दिवसांत जिल्ह्याला ४२ व्हेंटिलेटर्स उपलब्ध; जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2021 20:52 IST

CoronaVirus News in Sangali : गेल्या दहा दिवसांत जिल्ह्यात ४२ व्हेंटिलेटर्स व २० बायपॅप मशिनची उपलब्ध करण्यात आली असून शासकीय रुग्णालयांसह विविध खाजगी रुग्णालयांना यांचा पुरवठा करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली. 

ठळक मुद्दे३२ व्हेंटिलेटर प्रशासनामार्फत खरेदी करण्यात आली असून यामधील 2 सीएसआर फंडातून खरेदी करण्यात आली आहेत.

सांगली : कोरोना महामारीचा झपाट्याने वाढत असलेला प्रादुर्भाव लक्षात घेऊन गरजू रुग्णांना उपचाराची सुविधा निर्माण करण्यासाठी जिल्हा प्रशासन, आरोग्य यंत्रणा सर्वतोपरी प्रयत्नशील आहे. गेल्या दहा दिवसांत जिल्ह्यात ४२ व्हेंटिलेटर्स व २० बायपॅप मशिनची उपलब्ध करण्यात आली असून शासकीय रुग्णालयांसह विविध खाजगी रुग्णालयांना यांचा पुरवठा करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली. 

यातील ३२ व्हेंटिलेटर प्रशासनामार्फत खरेदी करण्यात आली असून यामधील 2 सीएसआर फंडातून खरेदी करण्यात आली आहेत. तर दहा व्हेंटिलेटर्स  वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मिरजसाठी राज्य शासनाकडून उपलब्ध झाली आहेत. यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मिरज, भारती हॉस्पिटल मिरज येथे प्रत्येकी तीन, मिरज ग्रुप ऑफ फिजिशियन मिरज यांना 2 , सिनर्जी हॉस्पिटल मिरज, सायना कोविड सेंटर गणेश नगर सांगली यांना प्रत्येकी एक व्हेंटिलेटर उपलब्ध करून देण्यात आले आहे. 

जत कोविड हॉस्पिटलला चार, भगवान महावीर कोविड हॉस्पिटल सांगली आणि क्रीडा संकुल मिरजला प्रत्येकी तीन , विवेकानंद हॉस्पिटल बामनोलीला दोन व्हेंटिलेटर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. याशिवाय श्वास हॉस्पिटल सांगली, घाडगे हॉस्पिटल सांगली, लाईफ केअर तासगाव , श्री हॉस्पिटल विटा, सद्गुरु हॉस्पिटल विटा, कवठे महांकाळ कोविड हॉस्पिटल, कोविड हॉस्पिटल पलूस,  देशमुख (सत्रे) चारिटेबल आयुर्वेदिक हॉस्पिटल इस्लामपूर , प्रकाश मेमोरियल क्लिनिक इस्लामपूर यांना प्रत्येकी एक व्हेंटिलेटर उपलब्ध करून देण्यात आले आहे. तसेच आटपाडी ग्रामीण रुग्णालयाला दोन व्हेंटिलेटर उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मिरज साठी राज्य शासनाने उपलब्ध करून दिलेले 10 वेंटिलेटर मिरज येथे पोहोच झाल्याचेही जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांनी यावेळी सांगितले.

याशिवाय, मिरज चेस्ट हॉस्पिटल मिरजला चार,  भारती हॉस्पिटल मिरजला पाच, वेध मल्टीस्पेशालिटी तासगाव , उपजिल्हा रुग्णालय इस्लामपूर,  पलूस ग्रामीण रुग्णालय यांना प्रत्येकी दोन तर वाळवेकर हॉस्पिटल सांगली यांना तीन बायपॅप मशीन उपलब्ध करून देण्यात आले आहेत, असे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी सांगितले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSangliसांगलीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसhospitalहॉस्पिटल