शहरं
Join us  
Trending Stories
1
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
2
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
3
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
4
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
5
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
6
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
7
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
8
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
9
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
10
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
11
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
12
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
13
ICC WTC Points Table : टीम इंडियापेक्षा लंका भारी! दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या स्थानावर झेप
14
सावधान! डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? 'या' ३ मोठ्या जोखमींमुळे पैसे बुडण्याची शक्यता
15
प्रेमासाठी ओलांडल्या देशासह धर्माच्या सीमा; पाकिस्तानी तरुणावर जडला भारतीय महिलेचा जीव
16
बिहारमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; मंत्रिमंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला?
17
पत्नीच्या नावाने म्युच्युअल फंडात SIP करताय? टॅक्स स्लॅब आणि 'कॅपिटल गेन्स'चे नियम स्पष्ट समजून घ्या!
18
जबरदस्तीची मिठी अन् दोन वेळा Kiss...! प्रसिद्ध ज्वेलर्सच्या मुलाचं घाणेरड कृत्य; व्हिडिओ व्हायरल
19
भारताचा लाजिरवाणा पराभव! आफ्रिकेने हरवल्यानंतर उपकर्णधार पंत म्हणतो- "आज झालेला पराभव...
20
दिल्ली स्फोट प्रकरण: डझनभर डॉक्टरांचे फोन बंद; 'अल फलाह' विद्यापीठातील मोठे नेटवर्क उघड
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus Lockdown :कोरोनाच्या लढाईत माणुसकीचे दर्शन, पोलीस दादाने दिला घासातील घास...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2020 11:54 IST

कोरोनाच्या लढाईत उन्हातान्हात उभे राहून पोलीस सेवा बजावतायत. माणसांचा जीव वाचविण्याची एकच तळमळ त्यांच्या मनात आहे तर मुक्या प्राण्यांच्या जीवाचीही त्यांना काळजी लागून राहिलीय.

ठळक मुद्देपोलीस दादाने दिला घासातील घास...श्वानांच्या पिलांची भूक भागविण्याची तळमळ

सागर गुजरसातारा : कोरोनाच्या लढाईत उन्हातान्हात उभे राहून पोलीस सेवा बजावतायत. माणसांचा जीव वाचविण्याची एकच तळमळ त्यांच्या मनात आहे तर मुक्या प्राण्यांच्या जीवाचीही त्यांना काळजी लागून राहिलीय.सातारा पोलीस दलातील पोलीस व राज्यस्तरावरील यशस्वी धावपटू असलेल्या रणजित कुंभार या पोलीसदादाने वर्दीतील माणुसकी दाखवून दिली. दुपारच्या जेवणावेळी झाडाखाली भटके श्वान गोळा होताच त्यांनी आपल्या डब्यातील भाकर त्यांना देऊन त्यांची भूक शमवली. गेल्या आठवड्यापासून या श्वानांची भूक भागत आहे.राज्यस्तरीय धावपटू असलेल्या रणजित कुंभार यांनी आपल्या अप्रतिम खेळाच्या जोरावर सातारा पोलीस दलाला अनेक मेडल मिळवून दिले आहेत. ते सध्या सातारा मुख्यालयात सेवा बजावतात.शहरातील तपासणी नाक्यावर रणजित कुंभार हे एका दुपारी झाडाखाली डबा खोलून जेवायला बसले होते. त्यांनी डबा खोलताच श्वानाची तीन पिले गोळा झाली. रणजित यांनी त्यांना भाकरीचा तुकडा टाकला. ती आवडीने खाऊ लागली. या श्वानांना त्यांची इतकी सवय लागलीय की ती तिन्ही पिले रोज जेवणाच्या वेळेत येत असल्याने रणजित ज्यादा जेवण नेत आहेत. पोलीस दलातर्फे दिलेली बिस्किटेही त्यांनी या श्वानांना दिली.मनुष्य हा प्रेमळ प्राणी आहे. मुक्या प्राणी मात्रांवर दया करावी, असे आपली संस्कृती सांगते. आपण कितीही थकलो अन् कामाच्या व्यापात असलो तरी पोटाची भूक भागवताना आजूबाजूच्या प्राण्यांकडेही लक्ष असावे. हे संस्कार आपल्या प्रत्येकावर आहेत. तेच संस्कार रणजित यांनी जपले आहेत.सुरुवातीला भिणारे नंतर मित्र झाले...रणजित कुंभार एका झाडाखाली दुपारच्यावेळी जेवणाचा डबा उघडून बसतात. पहिल्या दिवशी श्वानाची तीन पिले शेपटी हालवत त्यांच्या दिशेने पळत आले; परंतु मार बसेल या भीतीपोटी ते जवळ येत नव्हते. हा माणूस आपल्याला खाऊ देतोय म्हटलं की या श्वानांनी कुंभार यांच्याशी मैत्रीच केली. डबा उघडताच त्यांच्या भोवतीने ते गोळा होतात. आणि भूक शमवतात. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSangliसांगलीdogकुत्राPoliceपोलिस