शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात दुपारी १ वाजेपर्यंत ३०.८५ टक्के मतदान; 'या' मतदारसंघात मिळाला सर्वाधिक प्रतिसाद!
2
बारामतीतील EVM स्ट्राँगरुमचे CCTV अचानक बंद झाल्याचा सुळेंचा आरोप; निवडणूक अधिकारी म्हणाले...
3
धावत्या BULLET ला लागली आग; पेट्रोल टाकीचा स्फोट होऊन एकाचा मृत्यू तर 9 गंभीर जखमी
4
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates :राज्यात निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात दुपारी १ वाजेपर्यंत सरासरी ३०.८५ टक्के मतदान झाले
5
पैसे काढण्याशिवायही आहे तुमच्या ATM कार्डाचा उपयोग, त्यावर मिळणाऱ्या विम्याची माहिती आहे का? पाहा
6
Lok Sabha Election दरम्यान शेअर बाजारात का दिसतो चढ-उतार? आकडेवारीवरुन मिळेल उत्तर
7
Rahul Gandhi : "सरकार स्थापन झालं तर खटा-खट, खटा-खट पैसे..."; राहुल गांधींनी स्पष्टच सांगितलं
8
शरद पवारांकडून सुपारी घेऊन संजय राऊतांनी उबाठा संपवली; मनसेचा जोरदार पलटवार
9
रोहित वयाच्या ५० व्या वर्षापर्यंत क्रिकेट खेळू शकतो; युवीच्या वडिलांचा दावा, BCCI ला दिला खास सल्ला
10
भाजपा उमेदवार माधवी लता आणखी एका वादात; मतदान केंद्रावर महिलांच्या चेहऱ्यावरून काढला बुरखा;ओळखपत्र तपासले
11
Exclusive:"नरेंद्र मोदीच निवडून येतील असं वातावरण.."; श्रेयस तळपदेने स्पष्टच सांगितलं
12
'बजरंगी भाईजान'च्या मुन्नीने केलं आलमजेबला कॉपी; 'एक बार देख लिजिए'वर दिले जबरदस्त एक्स्प्रेशन्स
13
निलेश लंके हे सोशल मीडियाने निर्माण केलेलं वादळ, खरा चेहरा समोर आला; राधाकृष्ण विखेंचा हल्लाबोल
14
गुरु-केतु नवमपंचम योग: ३ राशींना दिलासा, ३ राशींनी अखंड सावध राहावे; नेमके काय करु नये?
15
सावनी रविंद्रनंतर सुयश टिळकलाही बजावता आला नाही मतदानाचा हक्क, म्हणाला - "ह्याची खंत वाटते..."
16
पोलीस कॉन्स्टेबल वराला प्रेयसीने भर मंडपातून पळवले, दुसऱ्या तरुणीशी विवाह होण्यापूर्वी रंगला ड्रामा
17
मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये ७-८ बॅगा; त्यात ५०० सफारी, सूट होते का? संजय राऊतांचा आरोप
18
पाकिस्तान विरूद्ध आयर्लंड मालिका म्हणजे क्लब क्रिकेट; PCB च्या माजी अध्यक्षाची टीका
19
PAK vs IRE: पहिल्या पराभवानंतर पाकिस्तानने लाज राखली; आयर्लंडची कडवी झुंज!
20
संविधान बदलण्याचं काम नेहरू-इंदिरा अन् राजीव गांधींनीच केलंय; नरेंद्र मोदींचा पलटवार

CoronaVirus Lockdown : गावाने नाकारले अन् माणुसकीच्या भिंतीने तारले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2020 1:01 PM

हातावर शिक्के नाहीत म्हणून गावकऱ्यांनी त्यांना राहू दिले नाही. त्यानंतर तीन दिवस त्यांचा डेरा कासेगावजवळ होता. त्यांची परवड पाहून इस्लामपूर पोलिसांनी त्यांचे पालकत्व स्वीकारले आणि माणुसकीच्या भिंतीने त्यांच्या पालनपोषणाची जबाबदारी घेतली आहे.

ठळक मुद्देगावाने नाकारले अन् माणुसकीच्या भिंतीने तारले!कागल तालुक्यातील ११ जणांची फरफट : पोलिसांनी घेतले पालकत्व

इस्लामपूर : मुंबईत कोरोनाचा हाहाकार माजल्याने त्याच्या भीतीने इथं मरण्यापेक्षा गड्या आपुला गाव बरा म्हणत तीन दिवसांपूर्वी मुंबईच्या सायन आणि घनसोली येथील १२ जण कागल तालुक्यातील आपल्या बेळवले मासा या गावी पोहोचले. मात्र कोरोनाने त्यांचा पिच्छा सोडला नाही.

हातावर शिक्के नाहीत म्हणून गावकऱ्यांनी त्यांना राहू दिले नाही. त्यानंतर तीन दिवस त्यांचा डेरा कासेगावजवळ होता. त्यांची परवड पाहून इस्लामपूर पोलिसांनी त्यांचे पालकत्व स्वीकारले आणि माणुसकीच्या भिंतीने त्यांच्या पालनपोषणाची जबाबदारी घेतली आहे.बेळवले मासा येथील हे १२ जण आहेत. त्यामध्ये ५ पुरुष आणि ५ महिला आहेत, तर वर्षभराचा एक बछडा आणि २ वर्षाचा एक मुलगा आहे. कोरोनाच्या भीतीने या सर्वांनी एक खासगी वाहन करून मुंबईपासून गावापर्यंत येताना अनेक अडथळे पार केले.

वाहनधारकाने त्यांना त्यांच्या गावात आणून सोडले आणि तो माघारी फिरला. पण इकडे या सर्वांचे दुर्दैव आड आले. कोरोनाची धास्ती ग्रामीण भागात अधिक आहे. बाहेरून येणाऱ्यांवर कडी नजर आहे. अशीच कडी नजर ठेवून असणाऱ्या गावकऱ्यांनी त्यांना त्यांच्या घराचे दारही उघडू दिले नाही. पोलिसांना कळवून त्यांची परत पाठवणी केली. कोल्हापूर पोलिसांनी सांगलीच्या हद्दीवर सोडले. सांगली पोलिसांनी कऱ्हाड हद्द गाठली; मात्र त्यांनी प्रवेश देण्यास नकार दिला.त्यावर इस्लामपूर पोलिसांनी त्यांना आपल्या आश्रयाखाली घेतले आणि पंक्तीला बसवून जेवू खाऊ घातले. महामार्गावर निवारा नसल्याने पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांनी इस्लामपूरमधील सद्गुरू ट्रस्टच्या डॉ. सत्यजित जाधव यांच्याशी संपर्क साधून त्यांना आश्रमशाळेतील खोल्यांमध्ये त्यांच्या निवासाची विनंती केली.जाधव यांनी त्याला तात्काळ होकार देत मदतीचा हात पुढे केला. शनिवारी रात्रीपासून हे सर्व प्रवासी येथे वास्तव्यास आहेत. पिंगळे यांच्या पुढाकाराने शहरातील दानशूर व्यक्तींची मदत घेत उभा राहिलेल्या माणुसकीच्या भिंतीने या सर्वांच्या खाण्या-पिण्याची व्यवस्था केली आहे.माणुसकीच्या भिंतीने या सर्वांची चांगली व्यवस्था केली आहे. पण गावाची ओढ लागलेले हे सर्वजण आम्हाला आमच्या गावी पोहोचवा, अशी आर्त विनंती करत आहेत. उपअधीक्षक पिंगळे हे स्वत: कोल्हापूर प्रशासनाशी संपर्क साधून आहेत. जिल्हा प्रवेशाचा परवाना मिळताच त्यांना पाठविले जाईल. मात्र तोपर्यंत ही माणुसकीची भिंत त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभी असणार आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिसSangliसांगली