शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
5
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
6
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
7
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
8
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
9
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
10
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
11
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
12
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
13
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
14
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
15
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
16
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
17
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
18
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
19
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
20
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे

CoronaVirus Lockdown : कोरोनापेक्षाही भयंकर मोबाईलरूपी व्हायरस; तुंगच्या घटनेने गांभीर्य वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2020 3:40 PM

मिरज तालुक्यातील तुंगजवळील विठलाईनगर येथे एका अल्पवयीन मुलाने आठवर्षीय मुलीवर अत्याचार करून, तिचा गळा आवळून खून केला. त्या मुलीला मोबाईलवर पॉर्न क्लिप दाखवित या मुलाने हा अत्याचार केल्याने, घटनेतील गांभीर्य अधिक वाढले आहे.

ठळक मुद्देकोरोनापेक्षाही भयंकर ठरतोय मोबाईलरूपी व्हायरस; तुंगच्या घटनेने गांभीर्य वाढलेकुटुंबातील संवाद हरवतोय; मोबाईलचा अतिवापर ठरतोय घातक

सांगली : मिरज तालुक्यातील तुंगजवळील विठलाईनगर येथे एका अल्पवयीन मुलाने आठवर्षीय मुलीवर अत्याचार करून, तिचा गळा आवळून खून केला. त्या मुलीला मोबाईलवर पॉर्न क्लिप दाखवित या मुलाने हा अत्याचार केल्याने, घटनेतील गांभीर्य अधिक वाढले आहे.

अजाणत्या वयात हाती आलेला मोबाईल आणि त्याचा माहीत नसलेला योग्य वापर, तसेच त्याचा योग्य वापरापेक्षा गैरवापरच अधिक होत असल्याने, अल्पवयीन मुलांच्या हाती मोबाईल देणे घातक ठरत आहे. सध्या सर्वत्र दहशत असलेल्या कोरोनापेक्षाही हा मोबाईलरूपी व्हायरसच अधिक चिंतनीय आहे, अशाच प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

तुंग येथील घटना सुन्न करणारी असून पालकांनी आपल्या मुलांना किती ह्यटेक्नोसॅव्हीह्ण करावे, याचा विचार करायला लावणारी आहे. मुलांच्या हाती मोबाईल दिल्यानंतर आई-वडिलांसह कुटुंबातील ज्येष्ठांनी मुलांवर लक्ष द्यायला हवे. पॉर्न फिल्म असो किंवा गेम्स, त्यामुळे मुलांकडून असे गैरप्रकार घडत आहेत. कुटुंबातील संवाद हरविल्यानेही मुले मोबाईलमध्ये अडकून पडत आहेत. त्यामुळे पालकांनी, समाजातील प्रत्येक घटकांनी संवेदनशीलता जपावी.- मनीषा दुबुले, अप्पर पोलीस अधीक्षक

अल्पवयीन मुलांकडून होणाऱ्या अशा प्रकाराला अनेक घटक कारणीभूत आहेत. लहान मुलांकडे पालक मोबाईल देतातच कसे, यापासून ते त्यावर पालकांचे नियंत्रण किती? असे अनेक प्रश्न निर्माण होतात. तंत्रज्ञानामुळे आपण संपर्कात आलो असलो तरी, त्यांचा मुलांकडून कार्टून, गेमसाठी होणारा वापर घातक असून, त्यामुळे मुले कमी वयात आक्रमक होत आहेत. लहान कोवळ्या मनावर जे बिंबवता येईल ते बिंबत असल्याने या मुलांमध्येही मोबाईलमुळे बदल घडत आहेत. आपल्या मुलांवर पालकांनी ह्यक्लोज वॉचह्ण ठेवणे हाच यावरील मुख्य पर्याय वाटतो आहे.डॉ. अनिता पागे,वैद्यकीय तज्ज्ञ

आधुनिक तंत्रज्ञानाची प्रत्येकाला समज असावी हे जरी खरे असले तरी, मोबाईलचा अतिवापर अधोगतीला नेत आहे. मोबाईलमधील अतिनील किरणे मुलांच्या डोळ्याला त्रासदायक तर ठरतातच, शिवाय चिडचीड, झोप न लागणे असेही त्रास निर्माण करत आहेत. ह्यस्क्रीन अ‍ॅडीक्टह्ण झालेल्या मुलांमुळे धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे वयाच्या १८ नंतरच मुलांकडे मोबाईल द्यावा.- प्रा. डॉ. संतोष माने, शैक्षणिक तज्ज्ञ

मुलांना मोबाईल द्यावा व त्यावर त्यांनी अभ्यास करावा, असा प्रवाह पुढे येत असतानाच, तुंगची घटना धक्कादायक आहे. पालक हौस म्हणून मुलांना मोबाईल देतात. पण कुतूहलापोटी मोबाईल हाती आल्यानंतर त्याची सवयच मुलांना लागत आहे. ज्याप्रमाणे विषाणू दिसत नसतो, अगदी तसेच मोबाईलचे दुष्परिणामही दिसून येत नाहीत. त्यामुळे पालकांनी मुलांचे मोबाईलचे लाड न पुरविता त्यांना इतर गोष्टींची सवय लावावी.- दयासागर बन्ने, साहित्यिक

मुलांना सहजपणे उपलब्ध होत असलेल्या तंत्रज्ञानामुळे त्याचा योग्य वापर त्यांना माहीत नाही. पालकही मुलांना मोबाईल, इंटरनेट उपलब्ध करून देत आहेत. त्यामुळे पालकांनी मुलांच्या भावनिक बदलाकडे लक्ष देऊन त्यांना सुविधा द्याव्यात. त्यांच्या भावना समजून घेतल्यास बºयाच अडचणी दूर होणार आहेत. किशोरवयीन मुलांचे पालकत्व हे सध्या आव्हानात्मक बनत आहे.- पूनम गायकवाड, मानसोपचार तज्ज्ञ

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMobileमोबाइलSangliसांगली