शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus Lockdown : खुद्द कृषी राज्यमंत्र्यांनी शेतामध्येच लावून दिलं कार्यकर्त्यांचं लग्न 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2020 18:15 IST

चिंचणी तालुका कडेगाव येथे एक अनोखं लग्न झालं. कृषी राज्य मंत्री विश्वजित कदम यांनी त्यांच्या एका कार्यकर्त्यांचं लग्न चक्क शेतामध्ये  लावून दिलं. या लग्नाची चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे.

ठळक मुद्देखुद्द कृषी राज्यमंत्र्यांनी शेतामध्येच लावून दिलं कार्यकर्त्यांचं लग्न सोशल डिस्टनसिंगचे पालन, फक्त १० लोकांची उपस्थिती 

कडेगाव :  देशात कोरोनाला रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आलं असतानाही सोशल डिस्टनसिंगचे पालन मोजक्या लोकांच्या उपस्थितीत  लग्नंही झाल्याची उदाहरणं आहेत. मात्र आता चिंचणी तालुका कडेगाव येथे एक अनोखं लग्न झालं. कृषी राज्य मंत्री विश्वजित कदम यांनी त्यांच्या एका कार्यकर्त्यांचं लग्न चक्क शेतामध्ये  लावून दिलं. या लग्नाची चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे. याबाबत माहिती अशी की, चिंचणी तालुका कडेगाव येथील अजय पाटील आणि कामळापूर तालुका खानापूर येथील भाग्यश्री गायकवाड यांचा विवाह लोकडाऊनमुळे दिवसेंदिवस लांबत चालला होता. लग्न दिमाखदार सोहळ्यात करण्याची दोघांच्याही कुटुंबियांची इच्छा होती.

काही दिवसांपूर्वी कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम व युवा नेते डॉ.जितेश कदम  यांचेशी अजयचे याबाबत बोलणे झाले. यावेळी कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी स्वतःच उपाय शोधून काढत  गुरुवारी  १४ मे रोजी दुपारी अजयच्या चिंचणी येथील शेतामध्ये लग्न घेण्याचा विचारमांडला .त्याला दोन्ही कुटुंबीयांनी होकार दिला.

प्रशासनाकडून मोजक्या १०  लोकांच्या उपस्थितीत  विवाह करण्याची परवानगी घेण्यात आली. त्याप्रमाणे नवरीकडील ५  आणि नावऱ्याकडील ५ अशा फक्त १० लोकांच्या उपस्थित शेतामध्ये विवाह  संपन्न झाला.

यावेळी कृषी राज्य मंत्री विश्वजित कदम व डॉ.जितेश कदम यांनी स्वतः उपस्थितीत राहून वधू - वरास शुभेच्छा दिल्या. यावेळी सोशल डिस्टनसिंगचे तंतोतंत पालन करण्यात आले .या लग्नाला नवरा नवरीचे  आई वडील आणि भटजी यांचेसह फक्त १० लोक उपस्थित होते.लग्न खर्चाऐवजी गरिबांना जीवनावश्यक वस्तू या विवाह सोहळ्यासाठी होणारा मोठा खर्च टाळून या पैशातून गावातील गोरगरीब लोकांना  जीवनावश्यक वस्तूंची किट घरोघरी पहोच करण्यात आली आहेत. या आदर्शवत उपक्रमाचे समाजातून कौतुक होत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याmarriageलग्नSangliसांगलीministerमंत्री