शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
2
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
3
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
4
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू
5
Hero: ड्युअल डिस्क ब्रेक्स, मल्टीपल राइडिंग मोड्स आणि बरेच काही; हिरो एक्सट्रीम १२५ आर लॉन्च!
6
Dance Bar Raid: उल्हासनगरातील चांदणी लेडीज सर्व्हिस बारवर पोलिसांची धाड, ९ महिलांसह १५ जणांना अटक
7
अरे देवा! मेट्रो स्टेशन तयार झालं पण नंतर कळालं उंचीच कमी, पुढं जे केलं ते पाहून थक्क व्हाल
8
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
9
चीनने वाढवली लष्करी ताकद! तिसरी विमानवाहू युद्धनौका 'फुजियान' तयार, अमेरिकेची चिंता वाढली
10
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
11
वीज चमकली की सुरू होतं काउंटडाउन!… काय आहे क्रिकेटच्या मैदानात क्वचित लागू होणारा '30:30 नियम'?
12
चॉकलेट की बिस्किट... आरोग्यासाठी जास्त धोकादायक काय? खाण्याआधी एकदा विचार कराच
13
बिहारमध्ये वाढलेल्या मतदानाचा अर्थ काय, कोणता फॅक्टरमुळे वाढलं मतदान? प्रशांत किशोरांनी मांडलं गणित
14
ब्रिस्बेनच्या मैदानात पावसाची बॅटिंग! टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली
15
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
16
डॉक्टरच्या लॉकरमध्ये मिळाली AK-47 रायफल, जम्मू-काश्मीर पोलीसही चकित; नेमकं प्रकरण काय?
17
"भैया मत करो...", बाईकवर मागे बसलेल्या तरुणीसोबत रॅपिडो चालकाचं धक्कादायक कृत्य
18
आधी ४५ कोटींचे मेट्रो स्टेशन बनवले, नंतर लक्षात आलं की उंची कमी झाली; मग...; हा जुगाड जाणून डोक्यावर हात माराल
19
Mumbai: कूपर रुग्णालयात मृत रुग्णाच्या नातेवाईकाकडून डॉक्टरांना मारहाण
20
"आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची"; राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर आगपाखड

CoronaVirus Lockdown : शेतातील भाजीपाला थेट ग्राहकांच्या दारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2020 12:23 IST

लॉकडाऊन व संचारबंदी सुरु असताना आरग (ता. मिरज) येथील शेतकऱ्यांनी संकटाचे रूपांतर संधीमध्ये केले आहे. शेतातील भाजीपाल्याची थेट ग्राहकांना घरपोच विक्री सुरु आहे. १६ प्रकारच्या भाज्या व फळांचे १२ किलोचे कीट ३५० रुपयात विक्री केले जात आहे. कृषी विभागाच्या मदतीने सुरू असलेल्या या उपक्रमास ग्राहकांचाही चांगला प्रतिसाद आहे.

ठळक मुद्देशेतातील भाजीपाला थेट ग्राहकांच्या दारात१६ प्रकारच्या भाज्या व दोन फळांच्या १२ किलोच्या कीटची विक्री

मिरज : लॉकडाऊन व संचारबंदी सुरु असताना आरग (ता. मिरज) येथील शेतकऱ्यांनी संकटाचे रूपांतर संधीमध्ये केले आहे. शेतातील भाजीपाल्याची थेट ग्राहकांना घरपोच विक्री सुरु आहे. १६ प्रकारच्या भाज्या व फळांचे १२ किलोचे कीट ३५० रुपयात विक्री केले जात आहे. कृषी विभागाच्या मदतीने सुरू असलेल्या या उपक्रमास ग्राहकांचाही चांगला प्रतिसाद आहे.लॉकडाऊनमुळे वाहतूक व परराज्यातील बाजार बंद असल्यामुळे मोठ्या प्रमाणात कृषीमाल शेतात पडून आहे. मात्र आरग येथील एक हजार शेतकऱ्यांनी एकत्र येऊन गट तयार केला आहे. रयत फार्मर्स प्रोड्युसर या नावाने तेकृषी मालाचे उत्पादन व विक्री करतात.

शेताच्या बांधावरून भाजी व फळे थेट ग्राहकांच्या घरापर्यंत आणून विक्री सुरु आहे.विविध प्रकारचा हायजिनीक भाजीपाला घरपोच करण्याची संकल्पना यांनी राबवली आहे. ताजा व स्वच्छ भाजीपाला थेट घरापर्यंत पोहोचत असल्याने सांगली-मिरजेतील ग्राहकांची चांगली मागणी आहे.शेतकऱ्यांनी १० ते १२ किलो वजनाचे भाजीपाल्याचे पॅकबंद कीट तयार केले आहे. त्यात कांदा, बटाटा, लसून, वांगी, दोडका, दुधी भोपळा, कढीपत्ता, आले, कोथिंबीर, शेवगा, टोमॅटो यासारख्या सोळा प्रकारच्या भाज्या व कलिंगड, चिक्कू या दोन फळांचा समावेश आहे. बाजारभावाप्रमाणे या भाज्यांचा दर साधारण सहाशे रुपयापर्यंत होतो. मात्र साडेतीनशे रुपयात हा भाजीपाला सांगली व मिरज शहरात विक्री होत आहे. मागणीसाठी फोन व व्हॉट्स अ‍ॅपचा वापर केला जात आहे.तालुका कृषी अधिकारी प्रदीप कदम यांनी, कमी दरात घरपोच भाजीपाला विक्रीचा उपक्रम शेतकºयांच्या व ग्राहकांच्या हिताचा असल्याचे सांगितले. प्रांताधिकारी समीर शिंगटे यांच्याहस्ते रयतच्या शेतीमालाच्या कीटचे ग्राहकांना वितरण सुरु करण्यात आले. प्रांताधिकाऱ्यांनी दलाल व व्यापारी वगळून शेतातील भाजीपाला थेट ग्राहकांना विक्री केल्याने दोघांचाही फायदा असल्याचे सांगितले.३५० रुपयात...कांदा  : १ किलोबटाटा : १ किलोटोमॅटो : अर्धा किलोकोबी : १ नगकाकडी : अर्धा किलोढबु मिरची : दीड किलोआले, लिंबू, कडीपत्ता : ५ नगहिरवी वांगी : १ किलोदोडका/गवार : १ किलोकारली : अर्धा किलोमेथी/कोथिंबीर : १ पेंडीलसूण : १०० ग्रामशेवगा/घेवडा : १ किलोचिक्कू : १ किलोकलिंगड/पपई  : १ नग

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSangliसांगलीvegetableभाज्या