शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus Lockdown : सांगलीत पोलिसांकडून दोनशेवर दुचाकी जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2020 15:58 IST

संचारबंदीच्या काळात विनाकारण रस्त्यावरून फिरणाऱ्या दुचाकीस्वारांना आवर घालण्यासाठी पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला. पोलिसांनी तब्बल २०० मोटारसायकली जप्त केल्या. या कारवाईमुळे दुचाकीस्वारांचे धाबे दणाणले आहेत.

ठळक मुद्देसांगलीत पोलिसांकडून दोनशेवर दुचाकी जप्त कारवाईमुळे दुचाकीस्वारांचे धाबे दणाणले

सांगली : संचारबंदीच्या काळात विनाकारण रस्त्यावरून फिरणाऱ्या दुचाकीस्वारांना आवर घालण्यासाठी पोलिसांनी  कारवाईचा बडगा उगारला. पोलिसांनी तब्बल २०० मोटारसायकली जप्त केल्या. या कारवाईमुळे दुचाकीस्वारांचे धाबे दणाणले आहेत.सांगली जिल्ह्यात कोरोनाचे २५ रुग्ण आढळून आले आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हा व पोलीस प्रशासनाने अनेक खबरदारीचे उपाय केले आहेत. महापालिका क्षेत्रात किराणा, भाजीपाला, दूध घरपोच करण्याची व्यवस्था आहे. तरीही सकाळच्या टप्प्यात रस्त्यावरील गर्दी कमी झालेली नाही. सकाळी दूध, भाजीपाला, किराणा आणण्यासाठी नागरिक दुचाकीवरून घराबाहेर पडत आहेत.कोरोनाचा संभाव्य धोका लक्षात घेता, पोलिसांनी आता सक्त कारवाई करण्याचे संकेत दिले होते. पोलीस उपअधीक्षक अशोक वीरकर, वाहतूक शाखेचे सहायक निरीक्षक अतुल निकम यांनी सोमवारी सायंकाळी, विनाकारण दुचाकीवरून फिरणाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार मंगळवारी शहरातील प्रमुख चौकात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.सकाळी सात ते नऊ या कालावधित पोलिसांनी विनाकारण रस्त्यावरून फिरणाºया २०० मोटारसायकली जप्त करून पोलीस ठाण्यात आणल्या. आता १४ एप्रिलपर्यंत या मोटारसायकली पोलिसांच्याच ताब्यात राहणार आहेत.अ३३ंूँेील्ल३२ ं१ीं

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSangliसांगलीPoliceपोलिस