शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus Lockdown : जिल्ह्यात ७५० पोलीस बंदोबस्तावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2020 17:26 IST

कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन घोषित केले असतानाही, जिवाची पर्वा न करता पोलीस कर्मचारी कर्तव्य बजावत आहेत. संचारबंदीची काटेकोरपणे अंमलबजावणी व्हावी, यासाठी ६७ पोलीस अधिकारी, तर ६५८ कर्मचारी बंदोबस्तावर तैनात आहेत.

ठळक मुद्देजिल्ह्यात ७५० पोलीस बंदोबस्तावरजिल्हाभर चोख पोलीस बंदोबस्ताचे नियोजन

सांगली : कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन घोषित केले असतानाही, जिवाची पर्वा न करता पोलीस कर्मचारी कर्तव्य बजावत आहेत. संचारबंदीची काटेकोरपणे अंमलबजावणी व्हावी, यासाठी ६७ पोलीस अधिकारी, तर ६५८ कर्मचारी बंदोबस्तावर तैनात आहेत.कोरोना विषाणूचा राज्यभर संसर्ग वाढत असतानाच, प्रशासनाने खबरदारी घेण्यास सुरूवात केली होती. तरीही जिल्ह्यात ९ रुग्ण आढळल्याने यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे. असे असले तरी व कोरोनाची भीती कायम असली तरी, नागरिक बिनधास्तपणे बाहेर फिरत आहेत. त्यांच्यावर निर्बंध घालण्यासाठी आता पोलिसांनी हातात काठी घेतली आहे.संचारबंदी व भारत लॉक डाऊनच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी गर्दी करू नये, यासाठी आता पोलिसांनी कडक बंदोबस्त तैनात केला आहे. कोरोना संसर्गाच्या खबरदारीवेळी पोलीस अधीक्षक सुहैल शर्मा, अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा दुबुले यांनी संपूर्ण जिल्हाभर चोख पोलीस बंदोबस्ताचे नियोजन केले आहे.सुरूवातीला जमावबंदीचा आदेश नागरी क्षेत्रापुरता मर्यादित होता. आता तो अधिक कडक करत संचारबंदीमुळे पोलिसांवरील ताणही वाढला आहे. त्यानुसार आता जिल्ह्याच्या सर्व सीमाही बंद ठेवण्यात आल्या आहेत. या सीमेवरील तपासणीवेळीही पोलिसांचा बंदोबस्त महत्त्वाचा ठरत आहे. शिवाय जिल्ह्यातील अनेक गावांनी स्वत:हून गावाच्या सीमा बंद केल्या आहेत. तिथे जाऊन गावकऱ्यांशी संवाद साधून यावर तोडगा काढण्यासाठीही प्रयत्न केले जात आहेत.महापालिका क्षेत्रात अगदी भाजीपाला, औषध दुकानांसह इतर ठिकाणीही नागरिकांची मोठी गर्दी होत असते. त्याठिकाणीही पोलिसांना आपले कर्तव्य बजावावे लागत आहे. यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्यानुसार सध्या ६७ पोलीस अधिकारी व ६५८ पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी कार्यरत आहेत. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSangliसांगलीPoliceपोलिस