शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : सांगलीत भाजप-शिवसेना आमने-सामने, कोरोनावरून आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2020 18:55 IST

कोरोनाचा वाढत्या संसर्गात राज्यातील विकास महाआघाडीचे सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करीत शुक्रवारी सांगलीत भाजपचे आमदार, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी काळे मास्क लावून निषेध केला. तर भाजपच्या या आंदोलनाला कुपवाड शिवसेनेने प्रत्युत्तर देत आम्ही ठाकरे सरकार सोबत असे फलक झळकविले.

ठळक मुद्देसांगलीत भाजप-शिवसेना आमने-सामने, कोरोनावरून आंदोलन भाजपचे काळे मास्क लावून निषेध तर शिवसेनेने सरकार सोबत असल्याचे फलक झळकविले

सांगली : कोरोनाचा वाढत्या संसर्गात राज्यातील विकास महाआघाडीचे सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करीत शुक्रवारी सांगलीत भाजपचे आमदार, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी काळे मास्क लावून निषेध केला. तर भाजपच्या या आंदोलनाला कुपवाड शिवसेनेने प्रत्युत्तर देत आम्ही ठाकरे सरकार सोबत असे फलक झळकविले.कोरोनाचा संसर्ग रोखण्यात महाआघाडी सरकारला अपयश आल्याच्या दावा करीत सरकारच्या निषेधार्थ भाजपच्यावतीने महाराष्ट्र बचाव आंदोलन करण्यात आले. भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्या कार्यालयासमोर जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे-म्हैसाळकर, महापौर गीता सुतार, युवा अध्यक्ष दीपक माने यांनी काळे मास्क लावून निषेध केला.गाडगीळ म्हणाले की, केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी करण्यात राज्य सरकार अपयशी ठरल्यानेच कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. आघाडी सरकार राजकारण करण्यात मग्न आहे. राज्यात पोलिसांवर हल्ले होण्याची प्रमाण वाढले आहे. त्यावर सरकार कोणत्याही उपाययोजना करीत नाही.

केंद्राने २० लाख कोटीचे पॅकेज जाहीर केले. महाराष्ट्रात व्यापारी, शेतकरी, बारा बलुतेदार यांची स्थिती गंभीर आहे. सरकारने त्यांच्यासाठी कोणतेही पॅकेज दिलेले नाही. कोरोना योद्धांना पीपीई कीट व इतर सुविधा दिल्या जात नाहीत. कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. या साऱ्या गोष्टीला सध्याचे अकार्यक्षम सरकार जबाबदारी असल्याचा आरोप केला.दरम्यान, भाजपच्या या आंदोलनाला शिवसेनेच्यावतीनेही प्रत्युत्तर देण्यात आले. कुपवाड शिवसेनेच्यावतीने आम्ही ठाकरे सरकारसोबत असे फलक झळकविण्यात आले. तसेच भाजपच्या आंदोलनाचा निषेधही करण्यात आला.

कोरोनाच्या काळात राज्य शासनाकडून चांगले काम सुरू आहे. भाजपला टीका करण्यासाठी कोणताच मुद्दा नसल्याने राजकीय हेतूने आंदोलन केले जात आहे. भाजपच्या आमदारांनी राजीनामा देऊन निषेध करावा, अशी मागणीही करण्यात आली. यावेळी शहरप्रमुख अमोल पाटील, उपजिल्हाप्रमुख महादेव मगदूम, अजित कांबळे, अविनाश पवार, रवि आदाटे, राजेंद्र पवार उपस्थित होते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याBJPभाजपाShiv SenaशिवसेनाSangliसांगली