खानापूर तालुक्यात गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:27 IST2021-09-11T04:27:26+5:302021-09-11T04:27:26+5:30

फोटो : विटा येथे शुक्रवारी विट्याचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने विट्याच्या राजाची साधेपणाने प्राणप्रतिष्ठापना केली. लोकमत न्यूज नेटवर्क विटा ...

Coronation on Ganeshotsav in Khanapur taluka | खानापूर तालुक्यात गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट

खानापूर तालुक्यात गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट

फोटो : विटा येथे शुक्रवारी विट्याचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने विट्याच्या राजाची साधेपणाने प्राणप्रतिष्ठापना केली.

लोकमत न्यूज नेटवर्क

विटा : खानापूर तालुक्यात गतवर्षीप्रमाणे यावर्षीही गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट पसरले असून सार्वजनिक गणेशोत्सवापेक्षा घरगुती गणेशोत्सवासाठी नागरिकात काही प्रमाणात उत्साह दिसून येत होता. भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या ‘विट्याचा राजा’ची प्राणप्रतिष्ठापना ही यावर्षी साधेपणाने करण्यात आली. तालुक्यातील २२ गावात ‘एक गाव एक गणपती’ संकल्पना राबविण्यात आली असून विटा शहरासह तालुक्यातील १६४ मंडळांनी शुक्रवारी विघ्नहर्ता श्री गणरायाची प्रतिष्ठापना केली. तर चार गावात मंडळांनी गणपती प्रतिष्ठापना केली नाही.

गेल्यावर्षीप्रमाणे या वर्षीही कोरोनामुळे कडक निर्बंध केले असल्याने सार्वजनिक गणेश मंडळात निरुत्साह दिसून आला; मात्र शुक्रवारी तालुक्यातील घरगुती गणेश मूर्ती व साहित्य खरेदी करण्यासाठी लोकांची बाजारपेठेत गर्दी झाली होती. यावर्षी गणेशमूर्तीच्या किमतीत वाढ झाली असल्याने त्याचा परिणाम मूर्ती विक्रेत्यांवर झाल्याचे दिसून आले. विटा शहरात विट्याच्या राजाची साधेपणाने प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी अध्यक्ष अमोल बाबर, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुहास बाबर, मंडळाचे उपाध्यक्ष पप्पू कदम यांच्यासह भाविक उपस्थित होते. विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष डोके यांनी केलेल्या आवाहनानुसार तालुक्यातील २२ गावात ‘एक गाव एक गणपती’ संकल्पना राबवण्यात आली आहे. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरासह तालुक्यात गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्यात येत आहे.

Web Title: Coronation on Ganeshotsav in Khanapur taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.