मिरज ‘सिव्हिल’मध्ये कोरोनाबाधित महिलेची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:19 IST2021-06-01T04:19:56+5:302021-06-01T04:19:56+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मिरज : मिरज शासकीय कोविड रुग्णालयात उपचार घेणाऱ्या सुमन गणेश कुंभार (वय ४२, रा. सुभाषनगर, ता. ...

Coronated woman commits suicide in Miraj 'Civil' | मिरज ‘सिव्हिल’मध्ये कोरोनाबाधित महिलेची आत्महत्या

मिरज ‘सिव्हिल’मध्ये कोरोनाबाधित महिलेची आत्महत्या

लोकमत न्यूज नेटवर्क

मिरज : मिरज शासकीय कोविड रुग्णालयात उपचार घेणाऱ्या सुमन गणेश कुंभार (वय ४२, रा. सुभाषनगर, ता. मिरज) या महिलेने रुग्णालयातील बाथरूममध्ये स्कार्फने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी पहाटे पाच वाजता घडली. कोराेनावरील औषधोपचाराला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याची चर्चा आहे. महिन्याभरापासून कोरोनावर मात करण्यासाठी त्यांची धडपड सुरु होती.

कोविडबाधित झाल्याने सुमन यांच्यावर गेले महिनाभर उपचार सुरू होते. त्यांची ऑक्सिजन पातळी कमी-जास्त होत असल्यामुळे त्यांना खासगी रुग्णालयातून दि. १३ मे रोजी मिरज शासकीय कोरोना रुग्णालयात दाखल केले होते. दोन दिवसांपासून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात येणार होता. मात्र, त्यापूर्वीच सोमवारी त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. मृत कुंभार यांच्या मृतदेहाचे विच्छेदन करण्यात आले. या आत्महत्येचे नेमके कारण समजलेले नसले तरी औषधोपचाराला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याची चर्चा होती. याबाबत गांधी चाैक पोलिसात नोंद आहे.

चाैकट

रुग्णालयात आत्महत्येची दुसरी घटना

मिरज शासकीय कोविड रुग्णालयात आत्महत्येची वर्षभरातील ही दुसरी घटना आहे. नऊ महिन्यांपूर्वी हुसेन बाबूमिया मोमीन या रुग्णानेही उपचार सुरू असताना, चाकूने स्वत:चा गळा कापून आत्महत्या केली होती. सोमवारी सुमन कुंभार या रुग्णाच्या आत्महत्येमुळे रुग्णालयात खळबळ उडाली होती.

Web Title: Coronated woman commits suicide in Miraj 'Civil'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.