कोरोनाचे नवे १०१३ रूग्ण; ३२ जणांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:20 IST2021-06-04T04:20:43+5:302021-06-04T04:20:43+5:30
प्रशासनाने चाचण्यांचे प्रमाण वाढवूनही बाधितांचे प्रमाण सरासरी एक हजारावर स्थिर आहे. मात्र, मृत्यूचे सत्र अद्यापही कायम आहे. जिल्ह्यातील २७ ...

कोरोनाचे नवे १०१३ रूग्ण; ३२ जणांचा मृत्यू
प्रशासनाने चाचण्यांचे प्रमाण वाढवूनही बाधितांचे प्रमाण सरासरी एक हजारावर स्थिर आहे. मात्र, मृत्यूचे सत्र अद्यापही कायम आहे. जिल्ह्यातील २७ जणांचा मृत्यू झाला असून त्यात सांगली ४, मिरज १, तासगाव व वाळवा प्रत्येकी ५, मिरज तालुक्यात ४, खानापूर ३, कडेगाव, पलूस प्रत्येकी २, तर जत तालुक्यात एकाचा मृत्यू झाला आहे.
गुरूवारी दिवसभरात आरटीपीसीआर अंतर्गत २५१६ जणांच्या नमुन्यांची तपासणी केली त्या ३८१ जणांना कोरोनाची बाधा झाली तर रॅपिड अँटिजनच्या ५६५६ जणांच्या नमुन्यांच्या तपासणीतून ६६१ जण पॉझिटिव्ह आढळले आहेत.
सध्या १० हजार ९२९ जण उपचार घेत असून त्यातील १५७० जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील १३३२ जण ऑक्सिजनवर तर २३८ जण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.
परजिल्ह्यातील पाचजणांचा मृत्यू झाला तर नवे २९ रूग्ण उपचारास जिल्ह्यातील रूग्णालयात दाखल झाले आहेत.
चौकट
आतापर्यंतचे एकूण बाधित १२१२८२
उपचार घेत असलेले १०९२९
कोरोनामुक्त झालेले १०६८४६
आतापर्यंतचे एकूण मृत्यू ३५०७
पॉझिटिव्हिटी रेट १२.७५
गुरूवारी दिवसभरात
सांगली ९९
मिरज ३८
वाळवा २०६
मिरज तालुका १२७
शिराळा १०९
कडेगाव ८५
खानापूर ८३
जत ७३
तासगाव ७१
कवठेमहांकाळ ६७
पलूस ३७
आटपाडी १८
चौकट
म्युकरमायकोसिसच्या नव्या ८ रुग्णांची नाेंद झाली असून बाधितांची संख्या २०० वर पोहोचली आहे.