कोरोनाची रुग्णसंख्या घटली, पण मृत्यू वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:31 IST2021-09-15T04:31:36+5:302021-09-15T04:31:36+5:30
सांगली : जिल्ह्यात मंगळवारी कोरोनाची रुग्णसंख्या सलग दुसऱ्या दिवशी दोनशेच्या खाली असून, नवे १९५ रुग्ण आढळून आले. पण कोरोनाने ...

कोरोनाची रुग्णसंख्या घटली, पण मृत्यू वाढले
सांगली : जिल्ह्यात मंगळवारी कोरोनाची रुग्णसंख्या सलग दुसऱ्या दिवशी दोनशेच्या खाली असून, नवे १९५ रुग्ण आढळून आले. पण कोरोनाने १४ जणांचा मृत्यू झाल्याने चिंता वाढली आहे. दिवसभरात ३१३ जण कोरोनामुक्त झाले.
मंगळवारी महापालिका क्षेत्रात २७ रुग्ण आढळून आले. त्यात सांगलीत २४, मिरजेत ३ रुग्णांचा समावेश आहे. आटपाडी तालुक्यात ३८, जत १४, कडेगाव १५, कवठेमहांकाळ ७, खानापूर ३५, मिरज १६, पलूस ६, शिराळा २, तासगाव १५, वाळवा २०, तर जिल्ह्याबाहेरील सोलापूर, सातारा येथील ३ रुग्णही उपचारासाठी दाखल झाले आहेत.
दिवसभरात जिल्ह्यातील १४ जणांचा मृत्यू झाला. त्यात खानापूर, पलूस, जत, वाळवा तालुक्यातील प्रत्येकी १, मिरज व कवठेमहांकाळ प्रत्येकी दोन, तासगाव ४, तर महापालिका क्षेत्रात सांगली व मिरजेतील प्रत्येकी एका रुग्णांचा समावेश आहे. सातारा जिल्ह्यांतील एकाचा मृत्यू झाला. सध्या ४८२ रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. आरटीपीसीआरच्या १५७९ चाचण्यांत ७२ पाॅझिटिव्ह, तर अँटिजनच्या ३१०४ चाचण्यांत १२६ रुग्ण सापडले.
चौकट
आतापर्यंतचे बाधित : १,९६१४३
कोरोनामुक्त झालेले : १,८९४५२
आतापर्यंतचे मृत्यू : ५१७१
उपचाराखालील रुग्ण : १५२०
चौकट
मंगळवारी दिवसभरात...
सांगली २४
मिरज ३
आटपाडी ३८
जत १४
कडेगाव १५
कवठेमहांकाळ ०७
खानापूर ३५
मिरज १६
पलूस ६
शिराळा २
तासगाव १५
वाळवा २०