सरत्या वर्षाच्या शेवटी कोरोनाची दिलासादायक स्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:22 IST2021-01-02T04:22:31+5:302021-01-02T04:22:31+5:30

सांगली : कोरोनाचा कहर अनुभवलेल्या वर्षाची अखेर दिलासादायक आकडेवारीने झाली. गुरुवारी दिवसभरात १२ जणांना कोरोनाचे निदान होताना जत तालुक्यातील ...

Corona's comforting condition at the end of the year | सरत्या वर्षाच्या शेवटी कोरोनाची दिलासादायक स्थिती

सरत्या वर्षाच्या शेवटी कोरोनाची दिलासादायक स्थिती

सांगली : कोरोनाचा कहर अनुभवलेल्या वर्षाची अखेर दिलासादायक आकडेवारीने झाली. गुरुवारी दिवसभरात १२ जणांना कोरोनाचे निदान होताना जत तालुक्यातील एकाचा मृत्यू झाला, तर १२ जण कोरोनामुक्त झाले आहेत. महापालिका क्षेत्रात केवळ एका नव्या रुग्णाची नोंद झालेली आहे.

गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेला कोरोनाचा उतार कायम असून बाधितांची संख्या कमी होत आहे. गुरुवारी या वर्षाच्या शेवटच्या दिवशी आतापर्यंतच्या कमी बाधितांची नोंद झाली.

आरोग्य विभागाच्यावतीने गुरुवारी आरटीपीसीआरअंतर्गत ३३४ नमुन्यांची चाचणी घेतली. त्यात ८ जण पॉझिटिव्ह आढळले, तर रॅपिड ॲन्टिजेनच्या ९२५ चाचण्यांमधून ४ जणांना कोरोनाचे निदान झाले आहे.

जिल्ह्यातील विविध रुग्णालयांत उपचार घेत असलेल्या १९० रुग्णांपैकी ४५ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील ३७ जण ऑक्सिजनवर, तर ८ जण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.

चौकट

आतापर्यंतचे एकूण बाधित ४७५९३

उपचार घेत असलेले १९०

कोरोनामुक्त झालेले ४५६७०

आतापर्यंतचे एकूण मृत्यू १७३३

गुरुवारी दिवसभरात...

सांगली १

आटपाडी, जत, कडेगाव, तासगाव प्रत्येकी २

कवठेमहांकाळ, खानापूर, मिरज तालुका प्रत्येकी १

Web Title: Corona's comforting condition at the end of the year