बाजार समितीत कोरोनायोध्द्यांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:32 IST2021-08-25T04:32:14+5:302021-08-25T04:32:14+5:30
सांगलीत बाजार समितीतर्फे कोरोनायोध्द्यांचा सत्कार झाला. यावेळी सभापती दिनकर पाटील, पुरवठा अधिकारी वसुंधरा बारवे, सहायक निबंधक उर्मिला राजमाने, पोलीस ...

बाजार समितीत कोरोनायोध्द्यांचा सत्कार
सांगलीत बाजार समितीतर्फे कोरोनायोध्द्यांचा सत्कार झाला. यावेळी सभापती दिनकर पाटील, पुरवठा अधिकारी वसुंधरा बारवे, सहायक निबंधक उर्मिला राजमाने, पोलीस निरिक्षक अजय सिंदकर आदी उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे कोरोनायोध्द्यांचा सत्कार करण्यात आला. जिल्हा पुरवठा अधिकारी वसुंधरा बारवे अध्यक्षस्थानी होत्या. सभापती दिनकर पाटील यांनी स्वागत केले.
सहायक निबंधक उर्मिला राजमाने, तहसीलदार डी. एस. कुंभार, उपायुक्त राहुल रोकडे, आरोग्याधिकारी डॉ. सुनील आंबोळे, पोलीस निरीक्षक अजय सिंदकर, अनिल तनपुरे, चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष शरद शहा, सचिव प्रशांत पाटील, संचालक मुजीर जांभळीकर, शीतल पाटील, नगरसेवक हरिदास पाटील, उपप्राचार्य जालिंदर यादव, गटविकास अधिकारी आप्पासाहेब सरगर, बाजार समितीचे संचालक बाळासाहेब बंडगर, सचिव महेश चव्हाण, कर्मचारी वजीर जांभळीकर, राजू नलवडे तसेच वसुंधरा बारवे यांचा सत्कार झाला.
कार्यक्रमाला उपसभापती तानाजी पाटील, संचालक वसंतराव गायकवाड, जीवन पाटील, अण्णासाहेब कोरे, देवगौंड बिरादार, प्रशांत शेजाळ, अभिजित चव्हाण, अजित बनसोडे, कुमार पाटील, दादासाहबे कोळेकर आदी उपस्थित होते.