कोरोना योद्ध्यांचा उचित सन्मान समाजाने करायला हवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:19 IST2021-05-31T04:19:39+5:302021-05-31T04:19:39+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क म्हैसाळ : कोरोना महामारीच्या संकटात सर्वस्व पणाला लावून काम करणाऱ्या कोरोना योद्ध्यांचा सन्मान गरजेचा असल्याचे प्रतिपादन ...

Corona warriors should be given due respect by the society | कोरोना योद्ध्यांचा उचित सन्मान समाजाने करायला हवा

कोरोना योद्ध्यांचा उचित सन्मान समाजाने करायला हवा

लोकमत न्यूज नेटवर्क

म्हैसाळ : कोरोना महामारीच्या संकटात सर्वस्व पणाला लावून काम करणाऱ्या कोरोना योद्ध्यांचा सन्मान गरजेचा असल्याचे प्रतिपादन आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले.

म्हैसाळ (ता. मिरज) येथे कोरोना योद्ध्यांना विमा प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्राजक्ता कोरे यांनी म्हैसाळ जिल्हा परिषद गटातील आशा स्वयंसेविका, कोरोना योद्धे यांचा विमा उतरवला, त्याची प्रमाणपत्रे पडळकर यांच्या हस्ते वितरित करण्यात आली. यावेळी म्हैसाळच्या सरपंच रश्मी शिंदे-म्हैसाळकर, भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे-म्हैसाळकर, विजयनगरचे माजी सरपंच राजकुमार कोरे आदी उपस्थित होते.

पडळकर म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीला सात वर्षे पूर्ण होत आहेत. हा दिवस समर्पण दिन म्हणून साजरा होत असताना प्राजक्ता कोरे यांनी आदर्शवत उपक्रम राबवला आहे. कोरोना योद्ध्यांचे कोरडे कौतुक न करता प्रत्यक्ष विमा उतरवून त्यांना सुरक्षाकवच प्रदान केले आहे. कोरोनानंतरसुद्धा त्यांच्या पाठीशी राहायला हवे.

दीपक शिंदे-म्हैसाळकर म्हणाले, संकटकाळात काम करणा-यांना विमा कवच देऊन कोरे यांनी महत्त्वपूर्ण काम केले आहे. यावेळी अशोक वडर, श्रीदीप गायकवाड आदींचा सत्कार झाला.

राजकुमार कोरे यांनी प्रास्ताविक तर नंदकुमार कोरे यांनी आभार मानले. यावेळी मिरज पंचायत समितीचे सदस्य दिलीपकुमार पाटील, माजी सरपंच आबासाहेब शिंदे-म्हैसाळकर, पुष्पराज शिंदे-म्हैसाळकर, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस धनंजय कुलकर्णी, पांडुरंग घोरपडे, अमर शेजवळकर, अतुल माळी उपस्थित होते.

Web Title: Corona warriors should be given due respect by the society

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.