corona virus : लक्षणे नसलेल्या रुग्णांसाठी होम आयसोलेशनचा पर्याय द्या :अभिजित चौधरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2020 04:36 PM2020-09-08T16:36:44+5:302020-09-08T16:38:21+5:30

ज्यांना गरज आहे अशाच रूग्णांना दाखल करून घेण्याची दक्षता रूग्णालयांनी घ्यावी, अशी सूचना जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दिली.

corona virus: offer home isolation option for asymptomatic patients: Abhijit Chaudhary | corona virus : लक्षणे नसलेल्या रुग्णांसाठी होम आयसोलेशनचा पर्याय द्या :अभिजित चौधरी

corona virus : लक्षणे नसलेल्या रुग्णांसाठी होम आयसोलेशनचा पर्याय द्या :अभिजित चौधरी

Next
ठळक मुद्देलक्षणे नसलेल्या रुग्णांसाठी होम आयसोलेशनचा पर्याय द्या :अभिजित चौधरीआवश्यकता असलेल्या रु ग्णांनाच दाखल करून घेण्याच्या सूचना

सांगली : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने गरजू, गंभीर रूग्णांना तात्काळ बेड्स उपलब्ध होण्यासाठी, ज्यांना गरज आहे अशाच रूग्णांना दाखल करून घेण्याची दक्षता रूग्णालयांनी घ्यावी, अशी सूचना जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दिली.

कोरोनाची सौम्य लक्षणे असणाऱ्या व ज्यांना लक्षणे नाहीत अशा रूग्णांना डेडिकेटेड कोविड रुग्णालयात दाखल करुन न घेता, तपासणीनंतर आवश्यकतेप्रमाणे डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर, कोरोना केअर सेंटर किंवा होम आयसोलेशनमध्ये उपचाराखाली ठेवण्यात यावे. ज्यांना गरज आहे अशाच रूग्णांना दाखल करून घेण्याची दक्षता रूग्णालयांनी घ्यावी, अशी सूचना जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दिली.

कोरोनाबाधीत रुग्णांसाठीच्या उपलब्ध बेड्सचे व्यवस्थापन सुधारण्यासाठी जिल्ह्यातील डॉक्टर्स, तपासणी पथक व टास्क फोर्सच्या टीमसमवेत जिल्हाधिकाऱ्यांनी संवाद साधला. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे, उपजिल्हाधिकारी विजया यादव उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. चौधरी म्हणाले, जिल्ह्यातील डेडिकेटेड कोविड रुग्णालयांनी, ज्या रूग्णांची प्रकृती स्थिर झाली आहे, अशांना हॉटेल, लॉज किंवा होस्टेलमध्ये ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत व त्यांच्या उपचाराचे नियोजन करावे. डॉक्टरांनी त्यांच्याकडे आलेल्या रूग्णांचे उपचाराबाबत योग्य प्रकारे समुपदेशन केल्यास ताण कमी होऊ शकतो.

प्रत्येक रूग्णालयाने त्यांच्या रूग्णालयात किती बेड्स आहेत, किती रूग्ण दाखल आहेत व किती बेड्स शिल्लक आहेत याचा बोर्ड रूग्णालयाच्या दर्शनी भागात लावून त्यावरील माहिती अद्ययावत ठेवावी. जेणेकरुन इतर रुग्णांना उपचाराचे नियोजन करण्यास मदत होणार आहे.

लक्षणे नसलेल्या व सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांची तपासणी करुन त्यांना तात्काळ कोविड केअर सेंटर अथवा इतर ठिकाणी उपचारासाठी दाखल करावे व आवश्यकता असलेल्या रुग्णास बेडची उपलब्धता करुन देण्याच्याही सूचना त्यांनी दिल्या.

डिपॉझिटची मागणी केल्यास कारवाई

कोरोना रुग्णांना दाखल करुन घेताना काही रुग्णालयांकडून डिपॉझिटची मागणी केली जात असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. ही बाब गंभीर असून रुग्णालयांनी रुग्णांची डिपॉझिटसाठी अडवणूक करु नये. तसेच रुग्णालयांनी डिपॉझिटची मागणी केल्यास त्या रुग्णालयावर कडक कारवाईचा इशाराही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिला.

Web Title: corona virus: offer home isolation option for asymptomatic patients: Abhijit Chaudhary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.