शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

corona virus : लेखा परिक्षणानंतर ९९ खाजगी रूग्णालयांना नोटीस,१३६ बिलांत तफावत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2020 16:47 IST

कोविड उपचारासाठी अधिग्रहित करण्यात आलेल्या ९९ हॉस्पीटलकडून आकारण्यात येणाऱ्या १३६ बिलांबाबत मोठ्या प्रमाणात तफावत आढळल्याने लेखा अधिकाऱ्यांच्या पथकाने  आत्तापर्यंत ७ लाख ९५ हजार ३६६ रूपयांची तफावतीची रक्कम संबंधित रूग्णांना परत करण्याबाबत आदेश दिले आहेत.

ठळक मुद्देलेखा परिक्षणानंतर खाजगी रूग्णालयांना नोटीसतफावतीची ७ लाख ९५ हजार ३६६ रूपयांची रक्कम परत करण्याचे निर्देश

सांगली : कोविड उपचारासाठी अधिग्रहित करण्यात आलेल्या ९९ हॉस्पीटलकडून आकारण्यात येणाऱ्या १३६ बिलांबाबत मोठ्या प्रमाणात तफावत आढळल्याने लेखा अधिकाऱ्यांच्या पथकाने  आत्तापर्यंत ७ लाख ९५ हजार ३६६ रूपयांची तफावतीची रक्कम संबंधित रूग्णांना परत करण्याबाबत आदेश दिले आहेत.  

शासनमान्य दराने देयकांची आकारणी केल्याबाबतची खात्री करण्यासाठी लेखा अधिकाऱ्यांच्या पथकाची नियुक्ती केली आहे. कोविड उपचारासाठी अधिग्रहित करण्यात आलेल्या हॉस्पीटलकडून आकारण्यात येणाऱ्या बिलांबाबत मोठ्या प्रमाणात तक्रारी होत आहेत. त्या अनुषंगाने शासनमान्य दराने देयकांची आकारणी केल्याबाबतची खात्री करण्यासाठी लेखा अधिकाऱ्यांच्या पथकाची नियुक्ती केली आहे.

या पथकाकडे लेखा तपासणीसाठी आत्तापर्यंत ३७९ देयके प्राप्त झाली असून यापैकी तफावत असलेल्या १३६ देयकांमधील ७ लाख ९५ हजार ३६६ रूपयांची तफावतीची रक्कम संबंधित रूग्णांना परत करण्याबाबत आदेशीत केले आहे. तर रूग्णालयांनी औषधाच्या व तपासणीच्या पावत्या सादर न केल्याने १९ लाख ८९  हजार ९९३ रूपयांची देयके आक्षेपाधीन ठेवली आहेत. लेखा तपासणी नंतर देयकांमध्ये अनियमतेबाबत विविध रूग्णालयांना एकूण ९९ नोटीस बजावण्यात आल्या आहेत. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.तफावत आढळलेल्या विविध १३६ रूग्णालयांमध्ये भारती हॉस्पीटल ६, कुल्लोळी हॉस्पीटल २९, विवेकानंद हॉस्पीटल ५, सेवासदन १२, मिशन हॉस्पीटल २४, घाटगे हॉस्पीटल १०, मेहता हॉस्पीटल १२  व सिनर्जी हॉस्पीटल, सांगली यांना १ अशा एकूण ९९ रूग्णालयांना विविध प्रकरणी नोटीस बजावण्यात आल्या आहेत. ज्यांचा खुलासा समाधानकारक नाही आणि अतिरिक्त बिलाची रक्कम जी रूग्णालये रूग्णांना परत करणार नाहीत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होणार असल्याचेही जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी स्पष्ट केले आहे.लेखा तपासणी पथक देयकांच्या अनुषंगाने नर्सिंग, आयसोलेशन, आयसीयु चार्जेस, रूम रेंट, कन्सल्टेशन, विविध चाचण्या, ऑक्सीजन, औषधे आदिंच्या शुल्क आकारणीबाबत काटेकोरपणे तपासणी करीत आहे. लेखा तपासणी पथकास आत्तापर्यंत १ कोटी ७७ लाख १२ हजार ६४९ रूपयांची ३७९ देयके प्राप्त झाली असून यापैकी १३६ देयकांमध्ये तफावत आहे.

यामधील ७  लाख ९५ हजार ३६६ इतकी तफावतीची रक्कम संबंधित रूग्णांना परत करण्याबाबत आदेशित केले असून यापैकी आत्तापर्यंत जादा बील आकारणी झालेल्या एका हॉस्पीटलने रूग्णास ४१ हजार ७९ रूपये रक्कम परत केली आहे तर अद्याप विविध रूग्णालयांनी रूग्णास परत करावयाची रक्कम ७ लाख ५४ हजार २८७ रूपये इतकी आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटलbillबिलSangliसांगलीcollectorजिल्हाधिकारी