शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

corona virus -इस्लामपुरच्या कोरोना मुक्तीला राजकीय श्रेयवादाची किनार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2020 14:56 IST

 इस्लामपूरच्या कोरोना मुक्तीला आता राजकीय श्रेयवादाची किनार येऊ लागली आहे.इस्लामपूर नव्हे तर उरुण-इस्लामपूर पॅटर्न आणि त्रिसूत्री नव्हे पंचसूत्रीचा अवलंब केला म्हणून शहर कोरोनामुक्त झाले असे सांगत आज नगराध्यक्ष निशिकांत भोसले- पाटील यांनी पालिका बैठकीत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे नाव न घेता टोले मारले.

ठळक मुद्देइस्लामपुरच्या कोरोना मुक्तीला राजकीय श्रेयवादाची किनारनगराध्यक्षानी दिले जयंतरावांना टोले

इस्लामपूर/सांगली : इस्लामपूरच्या कोरोना मुक्तीला आता राजकीय श्रेयवादाची किनार येऊ लागली आहे.इस्लामपूर नव्हे तर उरुण-इस्लामपूर पॅटर्न आणि त्रिसूत्री नव्हे पंचसूत्रीचा अवलंब केला म्हणून शहर कोरोनामुक्त झाले असे सांगत आज नगराध्यक्ष निशिकांत भोसले- पाटील यांनी पालिका बैठकीत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे नाव न घेता टोले मारले.पाटील म्हणाले, या शहराची नगरपालिका १६८ वर्षांची आहे. राजपत्रात या शहराचे नाव उरुण-इस्लामपूर असे आहे. त्यामुळे फक्त इस्लामपूर असे म्हणणारांनी उरुण-इस्लामपूर पॅटर्न म्हणावे, तसेच कोरोना बाधा आणि संसर्ग रोखण्यासाठी त्रिसूत्री नव्हे तर पंचसूत्रीचा अवलंब करण्यात आला हेसुद्धा लक्षात घ्यावे असा चिमटा पाटील यांनी काढला.

ते म्हणाले, बाधीत व्यक्ती समजल्यावर त्यांची संपर्क साखळी सिद्ध केली. त्यांचे स्क्रिनिंग करून कोणाला घरीच तर कोणाला संस्थात्मक क्वारंटाइन केले. या सर्व व्यक्तींना जीवनावश्यक सुविधा घरपोच दिल्या आणि थेट घरभेटीतून त्यांच्यावर उपचार सुरू केले, अशा पंचसूत्रीतून शहराला कोरोना मुक्त करण्यात यश मिळाले आहे.शहराची मातृ संस्था म्हणून नगर पालिकेच्या आरोग्य,पाणी पुरवठा, स्वच्छता विभागाच्या सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी जीव धोक्यात घालत काम केले. मुख्याधिकारी प्रज्ञा पवार यांनी तर कुटुंबाची काळजी न करता चांगले काम केले आहे. पालिकेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी नागरिकांचे जीवन सुसह्य होईल यासाठी नियोजनपूर्वक पाऊले उचलली, अशा सर्व सामूहिक प्रयत्नातून हे यश मिळाले असल्याकडे नगराध्यक्ष पाटील यांनी लक्ष वेधले.ही वेळ नाही..!दरम्यान या बैठकीला उपस्थित असणारे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख,नगरसेवक आनंदराव पवार यांनी पत्रकारांशी बोलताना ही वेळ श्रेयवादाची नाही, अशा संकटसमयी राजकारण बाजूला ठेवायला हवे. तसेच नागरिकांचे जीवन सुसह्य होईल याकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे सांगत दोन पाटलांमधल्या श्रेयवादावर नाराजी व्यक्त केली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याislampur-acइस्लामपूरJayant Patilजयंत पाटीलSangliसांगली