सर्वधर्मीय साधुसंतांना कोरोना लस द्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:25 IST2021-04-11T04:25:00+5:302021-04-11T04:25:00+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शिराळा : जैनधर्मीय साधू-साध्वी समुदायासह सर्वधर्मीय साधुसंतांना तातडीने कोरोना लसीकरण करण्यात यावे, अशी ...

Corona vaccine should be given to saints of all religions | सर्वधर्मीय साधुसंतांना कोरोना लस द्यावी

सर्वधर्मीय साधुसंतांना कोरोना लस द्यावी

लोकमत न्यूज नेटवर्क

शिराळा : जैनधर्मीय साधू-साध्वी समुदायासह सर्वधर्मीय साधुसंतांना तातडीने कोरोना लसीकरण करण्यात यावे, अशी मागणी गुजराती समाज महासंघाने केली आहे. याबाबत आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना निवेदन दिले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, सर्व संसार परित्याग करून धर्माची दीक्षा घेणाऱ्या साधू-साध्वी समुदायाकडे आधार कार्ड किंवा इतर कायदेशीर रहिवासी पुरावा असत नाही. त्यामुळे महाराष्ट्र राज्यात ठिकठिकाणी वास्तव्यास असणाऱ्या सर्वधर्मीय साधुसंतांसह जैनधर्मीय साधू-साध्वी समुदायाला तातडीने लसीकरण करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना लेखी आदेश द्यावेत, अशी मागणी केली आहे.

यावेळी मंत्री राजेंद्र पाटील यांनी या मागणीबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल, अशी ग्वाही दिली. संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र शाह, राज्य कार्यकारी समितीचे सदस्य तेजपाल शाह, अरविंद मणियार, प्रकाश शाह, युवराज शाह, स्वप्नील शाह, रोहन शाह, अक्षय शाह व अक्षय आलासे आदी उपस्थित होते.

Web Title: Corona vaccine should be given to saints of all religions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.