शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

सरकारच्या परवानगीसाठी रखडली सांगलीतील अँटीकोविड सिरम 'कोरोना लस'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2021 13:45 IST

नवीन कोरोना स्ट्रेनवर ही प्रभावी ठरणार, गंभीर कोरोना रुग्णांनाही फायदा होऊ शकतो

विकास शहा

सांगली - जिल्ह्यात शिराळा येथील आयसेरा बायोलॉजिकल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने प्लास्मा थेरपी जर यशस्वी होत असेल तर घोड्याच्या रक्तामध्ये ही प्रतिपिंडे तयार करुन ती रुग्णास दिल्यास तो हमखास बरा होईल याचा अभ्यास करून "अँटीकोविड सिरम " नावाखाली कोरोनाची लस बनवली आहे. मात्र, सरकारकडून औषधाच्या चाचण्या घेण्यासाठीच्या परवानगी प्रक्रियेत ही लस अडकली आहे. हे औषध उपलब्ध झाल्यास अनेक कोरोनाग्रस्तांचे प्राण वाचतील, एवढेच नव्हे तर नवीन कोरोनाच्या स्ट्रेनवरही ही लस प्रभावी ठरेल याची खात्री या संस्थेतील शास्त्रज्ञांनी दिली आहे.     येथील एमआयडीसीमध्ये कार्यरत असणाऱ्या या कंपनीला चीनमध्ये प्रतिजैविकाच्या वापराने मृत्युचे प्रमाण रोखण्यात यश आले आहे. त्याचाच वापर करुन कंपनीने "अँटीकोविड सिरम " लस बनवताना केला आहे. सर्पदंश, रेबीज, धनुर्वात, घटसर्प, विंचू दंश इत्यादी रोगांवरील प्रतिपिंडे ही घोड्याच्या रक्तामध्ये त्या रोगाचे विष अथवा जंतू ( मृत अथवा निष्क्रिय ) टोचून बनवली जातात व रोग्याला दिली जातात. अशी औषधनिर्मिती गेल्या कित्येक दशकापासून होत असून अनेक रुग्ण बरे झाले आहेत. प्लास्मा थेरपी जर यशस्वी होत असेल तर घोड्याच्या रक्तामध्ये ही प्रतिपिंडे तयार करून ती रुग्णास दिल्यास तो हमखास बरा होईल याची खात्री देता येते. हाच अभ्यास करुन सध्या ही प्रतिपिंडे येथील आयसेरा बायोलॉजिकल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने, सिरम इन्स्टिट्यूट, प्रीमियम सिरम यांच्या संयोगाने बनवली आहेत. 

जगाला आव्हान ठरलेल्या कोरोनाच्या बंदोबस्तासाठी मराठी माणूस पुढे सरसावला आहे. मानवजातीच्या अस्तित्वालाच आव्हान देणाऱ्या कोरोनाला हरविण्यासाठी प्रतापराव देशमुख, दिलीप कुलकर्णी, नंदकुमार यादव, धैर्यशील यादव यांची आयसेरा कंपनी पुढे सरसावली आहे. सांगली जिल्ह्यासह शिराळा तालुक्यासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. सरकारने या औषधाच्या चाचण्या घेण्यासाठी प्राथमिकता देणे आवश्यक आहे. हे औषध उपलब्ध झाल्यास अनेक कोरोनाग्रस्तांचे प्राण वाचतील, याची खात्री आहे. तसेच, कोरोनाच्या नवीन स्ट्रेनवर आणि गंभीर आजारावरील रुग्णांसाठी ही लस प्रभावी ठरणार आहे. 

कंपनीच्या शास्त्रज्ञांनी यांनी माहिती देताना सांगितले की, संपूर्ण भारतीय तंत्रज्ञानाने तयार होणारी लस ही प्रथम प्राण्यांवर चाचणी म्हणून उपयोग करण्यात येणार आहे. त्यानंतर सर्वत्र वापर करण्यात येईल. २०१६  पासून धर्नुवात, रेबीज, घटसर्प या रोगाची लस कंपनीकडून तयार करण्यात येत आहे. आता, कोरोना व्हायरस लागण झालेल्या रुग्णांसाठीही लस तयार करण्यात आली आहे. चीनमध्ये प्रतिजैविकाच्या वापराने मृत्यूचे प्रमाण रोखण्यात यश आले आहे, त्याचाच वापर 'आयसेरा' मध्ये केला जाईल. प्रतिजैविकांच्या वापराने जगभरात दिडशे वर्षापासून विविध आजारांवर नियंत्रण मिळविण्यात यश आले आहे. वयस्कर व कमी प्रतिकारक्षमतेच्या रुग्णांनाही ती जीवनदायी ठरतील. नवीन कोरोनाच्या स्ट्रेनवर, कोरोनाच्या गंभीर रुग्णांना, प्रचलित औषधांना प्रतिसाद न देणाऱ्या रुग्णांसाठी हे औषध प्रभावी ठरू शकेल, असा विश्वास कंपनीचे संचालक दिलीप कुलकर्णी यांनी यावेळी व्यक्त केला.

सरकारच्या सहकार्याची अपेक्षा १) प्लास्मा ऐवजी जर अँटीकोविड सिरम उपलब्ध झाल्यास हे एक संजीवनीसारखे ठरेल. शिवाय हे औषध गुणवत्ता व प्रभावी केल्याने अत्यंत कमी मात्रेमध्ये टोचले तरी याचा गुण येण्यास मदत होईल . आईसीएमआर व सरकारने परवानगी देऊन हे औषध कसे उपलब्ध करता येईल याबाबत सहकार्य करावे.

२) सध्या चार लाख लस तयार आहेत चाचणी ची परवानगी मिळाल्यास महिन्यास पंधरा ते वीस लाख लस तयार करण्यात येतील.

दिलीप कुलकर्णी संचालक आयसेरामाजी वरिष्ठ व्हाईस प्रेसिडेंट प्रीमियम सिरम 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याSangliसांगली