सांगली-मिरजेतील सात खासगी रुग्णालयांत आजपासून कोरोनाचे उपचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:27 IST2021-03-31T04:27:16+5:302021-03-31T04:27:16+5:30
सांगली : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन सांगली व मिरज शहरातील सात खासगी रुग्णालये आज, दि. ३१ ...

सांगली-मिरजेतील सात खासगी रुग्णालयांत आजपासून कोरोनाचे उपचार
सांगली : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन सांगली व मिरज शहरातील सात खासगी रुग्णालये आज, दि. ३१ मार्चपासून कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी आरक्षित करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दिले.
ते म्हणाले की, भारती हॉस्पिटल, वॉन्लेस हॉस्पिटल, मिरज चेस्ट हॉस्पिटल, मेहता हॉस्पिटल, कुल्लोळी हॉस्पिटल, वाळवेकर हॉस्पिटल आणि बामणोली येथील विवेकानंद हॉस्पिटलचा यात समावेश आहे. या रुग्णालयांच्या प्रशासनासोबत जिल्हाधिकाऱ्यांनी गुरुवारी बैठक होणार आहे. जानेवारी ते मार्चच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत जिल्ह्यात तीन हजार नव्याने रुग्ण आढळले. मात्र गेल्या पंधरा दिवसांपासून रुग्ण चौपट झाले आहेत. ग्रामीण क्षेत्रातसुद्धा प्रतिबंधात्मक व उपचारात्मक काम सुरू आहे. नोंदणीकृत खासगी रुग्णालये, नर्सिंग होम्स आणि मल्टिस्पेशालिटी रुग्णालये येथे कोविड रुग्णांवर उपचार होणे अपेक्षित आहे. वरील रुग्णालयांचा महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेत समावेश आहे. ही रुग्णालये कोविड रुग्णांवर उपचार करण्यासाठी तात्काळ आरक्षित करण्यात येत आहेत. त्यानुसार आयसीयू आणि आयसोलेशन वॉर्ड त्वरित कार्यन्वित करण्यात यावेत. बुधवारपासून उपचार चालू करण्यात यावेत. या आदेशाचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल. सर्व कर्मचारी कर्तव्य बजावत नसल्याचे निदर्शनास आल्यास गुन्हे दाखल होतील.