ग्रामीण रुग्णालयातून कोरोना चाचणीचे अहवाल वेळेत मिळावेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:34 IST2021-06-09T04:34:59+5:302021-06-09T04:34:59+5:30
भिलवडी : ग्रामीण भागातील आराेग्य उपकेंद्रांतील काेराेना चाचणीचे अहवाल वेळेत मिळत नाहीत. त्यामुळे काेराेनाचा प्रसार वाढत आहे, अशी ऑनलाईन ...

ग्रामीण रुग्णालयातून कोरोना चाचणीचे अहवाल वेळेत मिळावेत
भिलवडी : ग्रामीण भागातील आराेग्य उपकेंद्रांतील काेराेना चाचणीचे अहवाल वेळेत मिळत नाहीत. त्यामुळे काेराेनाचा प्रसार वाढत आहे, अशी ऑनलाईन तक्रार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सांगली जिल्हा कार्याध्यक्ष संदीप राजोबा यांनी जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चाैधरी यांच्याकडे केली आहे.
संदीप राजोबा यांनी ब्रह्मनाळ (ता. पलूस) येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात ॲन्टिजेन व आरटीपीसीआर चाचणी केली होती. त्यांची ॲन्टिजेन चाचणी निगेटिव्ह असल्याचा मेसेज ४ जूनला मिळाला. ५ जूनला आरटीपीसीआर चाचणीसाठी मिरज काेविड प्रयाेगशाळेमध्ये स्राव मिळाल्याचा मेसेज मोबाईलवरून मिळाला. ८ जूनपर्यंत या चाचणीबाबत कोणताच अहवाल त्यांना मिळालेला नाही. काेराेना चाचणीचे अहवाल मिळण्यास आरोग्य विभागाकडून विलंब होत आहे. हे अहवाल येईपर्यंत नागरिक कामानिमित्त बाहेर फिरू शकतात व इतरांना बाधित करू शकतात. भिलवडी प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत विविध उपकेंद्रांत चाचणी केलेल्या नागरिकांना वेळेत अहवाल मिळत नाहीत. जिल्हा प्रशासनाने याची वेळीच दखल घ्यावी. रुग्णांना वेळीच अहवाल देऊन सहकार्य करावे, अशी मागणी ऑनलाईन निवेदनाद्वारे राजोबा यांनी केली आहे.
चौकट
जिल्हाधिकाऱ्यांकडून दखल
जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी या ऑनलाईन तक्रारीची दखल घेतली असून, आरोग्य विभागास या प्रकरणाची योग्य ती चौकशी करावी, तसेच चाचणीचे अहवाल निर्धारित वेळेत देऊन नागरिकांची गैरसोय टाळवी, असे आदेश दिले आहेत.