लोकमत न्यूज नेटवर्क
शिराळा : शिराळा शहर व परिसरातील कोरोना संक्रमणाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, खास पथकाद्वारे शहरातील बाजारपेठेचा परिसर, विनाकारण फिरणारे तसेच कोरोनासंक्रमित रुग्णांच्या आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांच्या रॅपिड अँटिजन चाचणीस मंगळवारी सुरुवात करण्यात आली.
तहसीलदार गणेश शिंदे यांच्या आदेशानुसार नगरपंचायतीमार्फत कोरोना तपासणी पथक तयार करण्यात आले आहे. या पथकाद्वारे शहरातील बाजारपेठ परिसर, विनाकारण फिरणारे, तसेच कोरोनासंक्रमित रुग्णांच्या आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांच्या चाचणीस सुरुवात करण्यात आली.
पहिल्याच दिवशी या पथकाद्वारे शहरात सुमारे १०० व्यापारी व नागरिक यांची तपासणी करण्यात आली. नगरपंचायतीच्या कार्यालयीन अधीक्षक सुविधा पाटील, गणपती इंगवले, संजय इंगवले, तात्यासाहेब कांबळे, विकास कापसे, मंडल अधिकारी सागर खैर, तलाठी अभिजित मस्के, हवालदार आर. एस. बामणे यांचा पथकात समावेश आहे. या पथकाद्वारे तपासणीवेळी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण पाटील, मुख्याधिकारी योगेश पाटील उपस्थित होते.
===Photopath===
290621\201-img-20210629-wa0031.jpg
===Caption===
रॅपिड अँटीजन टेस्ट करण्यास