रिक्षाचालकांना कोरोना चाचणी सक्तीची; ४५ वर्षांवर लस घ्यावी लागणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:25 IST2021-04-18T04:25:30+5:302021-04-18T04:25:30+5:30
महापालिका क्षेत्रातील रिक्षाचालकांची बैठक उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांच्या कार्यालयात झाली. त्यावेळी कांबळे यांनी रिक्षाच्या चालक व मालकांसाठी नियमावली स्पष्ट केली. ...

रिक्षाचालकांना कोरोना चाचणी सक्तीची; ४५ वर्षांवर लस घ्यावी लागणार
महापालिका क्षेत्रातील रिक्षाचालकांची बैठक उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांच्या कार्यालयात झाली. त्यावेळी कांबळे यांनी रिक्षाच्या चालक व मालकांसाठी नियमावली स्पष्ट केली. ते म्हणाले की, ४५ वर्षांवरील सर्व रिक्षाचालकांनी कोरोनाची लस टोचून घेतली पाहिजे. लसीकरणाचे प्रमाणपत्र सोबत ठेवणे आवश्यक आहे. ४५ वर्षांखालील रिक्षाचालकांनी कोरोनाची चाचणी करून घ्यावी. चाचणी निगेटिव्ह असल्यास तसा अहवाल सोबत ठेवावा. रिक्षामध्ये प्लास्टिकचा पडदा लावून प्रवासी व चालकामध्ये सुरक्षित अंतर राखावे. रिक्षात दोनच प्रवासी घ्यावेत. रिक्षाचालकाने मास्क लावावा, सॅनिटायझर ठेवावे. बैठकीला विविध रिक्षा संघटना व टॅक्सी- मॅक्सी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
रिक्षा व्यावसायिकांकडून नियमांचे पालन होईल अशी हमी सांगली जिल्हा रिक्षा पंचायतीचे अध्यक्ष राजू रसाळ, प्रवासी वाहतूक रिक्षा संघटनेचे अध्यक्ष महेश चौगुले, कुपवाड रिक्षा संघटनेचे फारूक मकानदार यांनी दिली.