मिरज पश्चिम भागामध्ये ९०० जणांना कोरोनाची बाधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:20 IST2021-05-31T04:20:52+5:302021-05-31T04:20:52+5:30
दुधगाव, कवठेपिरान, सावळवाडी, माळवाडीत बाधितांची संख्या गतीने वाढते आहे. या भागात कडक उपाययोजनेची गरज आहे ...

मिरज पश्चिम भागामध्ये ९०० जणांना कोरोनाची बाधा
दुधगाव, कवठेपिरान, सावळवाडी, माळवाडीत बाधितांची संख्या गतीने वाढते आहे.
या भागात कडक उपाययोजनेची गरज आहे अन्यथा परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता आहे. या भागात कोरोनाबाधिताची संख्या झपाट्याने वाढत आहे, मात्र, दुसऱ्या बाजूला ग्रामस्थांची बेफिकिरी वाढत चालली आहे. कृषी सेवा केंद्र पतसंस्था, बँका, दूध डेअरी तसेच रस्त्यावर विनामास्क लोक बिनधास्तपणे फिरताना दिसत आहे. बहुसंख्य ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन होत आहे. काही जणांच्या निष्काळजीपणामुळे हजारो लोक जीव धोक्यात घालत आहेत. त्यामुळे वाढता प्रादुर्भाव कमी करण्यासाठी कोणाचीही भीड न ठेवता कारवाई करणे गरजेचे आहे.
दुधगाव, कवठेपिरान, सावळवाडी या गावांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. या गावांमध्ये कडक निर्बंधांची गरज आहे. परिस्थिती हाताबाहेर जाण्याचा अगोदरच उपाययोजना करा, अशी मागणी होत आहे.